IND vs WI : संजूने मॅच जिंकली, पण सूर्याच्या धाडसी निर्णयाने धडकी भरली, 'त्या' एका गोष्टीने संपूर्ण मॅच फिरली
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
संजूने जरी हा सामना जिंकवला असला तरी सामन्याच्या सूरूवातीला कॅप्टन सूर्यकुमार यादव याने धाडसी निर्णय घेतला होता. याच निर्णयाने अख्खी मॅच फिरली होती.
advertisement
1/10

टी20 वर्ल्ड कपमध्ये आज कोलकत्ताच्या ईडन गार्डनच्या मैदानावर संजू सॅमसनने अनपेक्षित अशी 97 धावांची मॅच विनिंग खेळी करून वेस्ट इंडिजचा 5 विकेटने पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं आहे.
advertisement
2/10
खरं तर वेस्ट इंडिजने दिलेल्या 195 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सूरूवात खराब झाली होती.कारण अभिषेक शर्माने 10 धावांची खेळी आहे. त्याच्यानंतर ईशान किशनही 10 धावांवर बाद झाला होता. त्यामुळे संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादवने भारताचा डाव सावरला होता. या दरम्यान संजू सॅमसनने अर्धशतकीय खेळी केली होती.
advertisement
3/10
संजूने एका बाजूने डाव सावरला असताना कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या हातून मोठी चूक झाली तो बाऊंड्री लाईनवर कॅच देऊन बसला होता.
advertisement
4/10
कॅप्टन सूर्या बाद झाल्यानंतर तिलक वर्मा मैदानात आला होता,पण 27 धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर हार्दिक पांड्या मैदानात आला होता.
advertisement
5/10
टीम इंडियाचे एका मागून एक विकेट पडत असताना संजू सॅमसनने एकाबाजूने भारताचा डाव सावरला आणि टीम इंडियाला विजयापर्यंत खेचून नेलं.या दरम्यान त्याने 50 बॉल 97 धावांची नाबाद आणि मॅच विनिंग खेळी केली.
advertisement
6/10
संजूने जरी हा सामना जिंकवला असला तरी सामन्याच्या सूरूवातीला कॅप्टन सूर्यकुमार यादव याने धाडसी निर्णय घेतला होता. याच निर्णयाने अख्खी मॅच फिरली होती
advertisement
7/10
त्याचं झालं असं की या सामन्यात सूर्याने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.सूर्याने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली पण तो फलंदाजीही करू शकला असता. पण सूर्याने शातीर खेळी करत गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला आहे, सूर्याने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.त्यात एवढं काय आहे.
advertisement
8/10
तर भारता विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा चार वेळा पराभव झाला आहे. 5 विकेट्सने पराभव, कोलकाता, 2018 6 विकेट्सने पराभव, चेन्नई, 2018 6 विकेट्सने पराभव, हैदराबाद, 2019 6 विकेट्सने पराभव, कोलकाता, 2022
advertisement
9/10
तर भारताविरूद्ध आता पर्यंत वेस्ट इंडिज प्रथम फलंदाजी करताना 4 वेळा सामना हारली आहे. हीच गोष्ट लक्षात ठेवून सूर्याने वेस्ट इंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. आणि आता सूर्याची ही रणनिती यशस्वी ठरली आहे. त्यामुळे सूर्याचा धाडसी निर्णय मॅच फिरवून गेला.
advertisement
10/10
या विजयानंतर टीम इंडिया सेमी फायनलला पोहोचली आहे. टीम इंडियाता सेमी फायनलचा सामना हा इंग्लंड विरूद्ध असणार आहे. हा सामना 4 मार्चला रंगणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs WI : संजूने मॅच जिंकली, पण सूर्याच्या धाडसी निर्णयाने धडकी भरली, 'त्या' एका गोष्टीने संपूर्ण मॅच फिरली