TRENDING:

Kashmir Protest: लाल चौकात शेकडोंची निदर्शने, ४० दिवसांचा दुखवटा, काश्मीरमध्ये घडतंय काय?

Last Updated:
Kashmir Protest Iran Isarel Conflict: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर भारतातही त्याचे पडसाद उमटले. श्रीनगरमधलील लाल चौक परिसरात काश्मीरी जनतेने आंदोलन केले.
advertisement
1/6
लाल चौकात शेकडोंची निदर्शने, ४० दिवसांचा दुखवटा, काश्मीरमध्ये घडतंय काय?
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिका-इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाल्याची बातमी कळताच काश्मीर खोऱ्यातील लोक रस्त्यावर उतरले.
advertisement
2/6
शेकडो निदर्शक खामेनींचे मोठे फोटो आणि पोस्टर्स घेऊन रस्त्यावर उतरले. त्यांनी खामेनी यांच्या समर्थनात आणि अमेरिका-इस्राएल विरोधात घोषणाबाजी केली.
advertisement
3/6
अयातुल्ला अली खमेनी यांना इस्लामिक एकता आणि शिया मुस्लिम समुदायाचे प्रतीक मानले जाते. जगभरातील शिया मुस्लिम समुदायात त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यांच्या मृत्यूवर काश्मीरमध्ये आंदोलनकर्त्यांनी दुखवटा पाळणार असल्याचे म्हटले आहे.
advertisement
4/6
अमेरिका-इस्रायली ऑपरेशन "ऑपरेशन एपिक फ्युरी" हे इस्लामवर आणि विशेषतः शिया मुस्लिम समुदायावर हल्ला मानत आहेत. या ऑपरेशनमध्ये ४० हून अधिक इराणी नेते मारले गेले, ज्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढला.
advertisement
5/6
काश्मीरमध्ये इराणच्या सर्वोच्च नेत्याचा मृत्यू हा केवळ एक राजकीय घटना नसून धार्मिक आणि सांप्रदायिक भावनांशी संबंधित एक प्रमुख मुद्दा मानला जात आहे. काश्मीरमधील लोकांनी आपला संताप आणि निषेध व्यक्त केला आहे.
advertisement
6/6
शनिवारी, इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी आणि त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचा मृत्यू झाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
Kashmir Protest: लाल चौकात शेकडोंची निदर्शने, ४० दिवसांचा दुखवटा, काश्मीरमध्ये घडतंय काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल