TRENDING:

Holi Rules : होळीदरम्यान सौदी अरबमध्ये 'या' चुकीला नसते माफी; दिसताच केली जाते कडक कारवाई

Last Updated:
Holi rules in Saudi Arab : भारतामध्ये होळीची खूप धुमधाम असते. आपल्याकडे होळी, धूलिवंदन मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. रंगांची सर्वत्र उधळण केली जाते. एकमेकांना आनंद, शुभेच्छा आणि गोडधोड पदार्थ वाटले जातात. मात्र जगातील काही देशांमध्ये भारतीय लोक जरी असले तरी त्या देशांमध्ये होळीविषयीचे नियम खूप कडक आणि वेगळे आहेत. चला पाहूया सविस्तर माहिती.
advertisement
1/7
होळीदरम्यान सौदी अरबमध्ये 'या' चुकीला नसते माफी; दिसताच केली जाते कडक कारवाई
प्रत्येक देशांची धार्मिक संस्कृती वेगवेगळी आहे. त्यामुळे त्यानुसार बरेच नियम वेगळे असतात. भारतात होळीचा सण उत्साहात साजरा होत असला तरी जगातील काही देशांमध्ये मात्र याबद्दल खूप कडक कायदे आहेत. सौदी अरब हा त्यांपैकीच एक.
advertisement
2/7
सौदी अरबमध्ये होळीसारखा सण सार्वजनिकरित्या साजरा करणं कठीण आहे. इथले कायदे इस्लामिक तत्त्वांवर आधारित आहेत आणि सार्वजनिक जीवनात धार्मिक शिस्तीला खूप महत्त्व दिलं जातं.
advertisement
3/7
होळीसारख्या गैर-इस्लामी सण इथे साजरा करण्यास परवानगी नाही. बऱ्याच लोकांना माहित नाही की, या देशामध्ये रस्त्यावर रंग खेळताना किंवा सार्वजनिकरित्या उत्सव साजरा करताना कोणी दिसल्यास, त्यांना तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
advertisement
4/7
इथे गैर-मुस्लिम समुदायांचे धार्मिक कार्यक्रम फक्त खाजगी जागांमध्ये किंवा दूतावासांसारख्या परिसरात साजरे करण्यास परवानगी आहे. सार्वजनिक ठिकाणी रंग फेकणं किंवा मिरवणुका काढणं या गोष्टींना कायद्याचे उल्लंघन मानलं जातं.
advertisement
5/7
इथे सार्वजनिक जागेवर रंग खेळताना किंवा धार्मिक सण साजरे करताना पकडले गेल्यास शिक्षा होऊ शकते. प्रकरणाच्या तीव्रतेनुसार त्यांना दंड किंवा तुरुंगवास होतो, परदेशी नागरिकांना हद्दपारदेखील केलं जाऊ शकतं.
advertisement
6/7
इथे सार्वजनिक ठिकाणी तुमचा पोशाख, वैयक्तिक वर्तन अशा अनेक गोष्टीसाठी स्पष्ट नियम आहेत. कारण सौदी अरबमधील कायदा आणि सुव्यवस्था शरिया कायद्यानुसार चालते. इथे चुकीच्या सवयी जसे की, दारू, ड्रग्ज आणि इतर अनेक सामाजिक बाबींबद्दलही खूप कठोर कायदे आहेत, ज्यांचे उल्लंघन केल्यास शिक्षा होणे अटळ आहे. (All Photo Credit : Canva)
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Holi Rules : होळीदरम्यान सौदी अरबमध्ये 'या' चुकीला नसते माफी; दिसताच केली जाते कडक कारवाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल