TRENDING:

'पुजारी' पुण्यातील मंदिरात आला; देवाला हात जोडले अन् मग तिथेच नको ते कांड, पण एक चूक अन् 48 तासात झाला 'गेम'

Last Updated:

तो पुजाऱ्याचा पेहराव करून मंदिरात दाखल झाला. कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने सर्वात आधी देवाचे दर्शन घेतले, हात जोडले

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पिंपरी-चिंचवड : भक्तीच्या नावाखाली चोरी करणाऱ्या एका अट्टल चोराने चिंचवडमधील जैन मंदिरात डल्ला मारला. मात्र त्याची एक चूक त्याला महागात पडली. पुजाऱ्याचा वेश परिधान करून मंदिरात शिरलेल्या या चोरट्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट १ ने अवघ्या ४८ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. नरेश अगरचंद जैन असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
अवघ्या 48 तासांत बेड्या (प्रतिकात्मक फोटो)
अवघ्या 48 तासांत बेड्या (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

काय घडली घटना?

चिंचवड येथील भगवान श्री आदेश्वर शंकेश्वर पार्श्वनाथ जैन मंदिरात ही घटना घडली. आरोपी नरेश जैन याने चोरी करण्यासाठी एक भन्नाट शक्कल लढवली. तो पुजाऱ्याचा पेहराव करून मंदिरात दाखल झाला. कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने सर्वात आधी देवाचे दर्शन घेतले, हात जोडले आणि संधी मिळताच देवाच्या डोक्यावरील २.५ लाख रुपये किमतीचा चांदीचा मुकूट शिताफीने चोरला. त्याने तो मुकूट एका कपड्यात झाकला आणि कोणालाही कळण्यापूर्वी तो मंदिरातून पसार झाला.

advertisement

सीसीटीव्हीने केला खेळ खल्लास

चोरटा मुकूट घेऊन पळून गेल्यावर आपल्याला कोणीही पाहिले नाही, अशा भ्रमात तो होता. मात्र, मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी त्याची प्रत्येक हालचाल कैद केली होती. चोरीचा प्रकार लक्षात येताच मंदिर प्रशासनाने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पुजाऱ्याच्या वेशातील चोरट्याचा चेहरा स्पष्ट दिसला.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
होळीला बाहेरचे रंग कशाला, घरीच बनवा केमिकल मुक्त कलर, making चा संपूर्ण Video
सर्व पहा

गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या जोरावर अवघ्या ४८ तासांत नरेश जैनला ताब्यात घेतले. तपासात धक्कादायक माहिती समोर आली की, नरेश हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत यापूर्वीच १२ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा चांदीचा मुकूट हस्तगत केला आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
'पुजारी' पुण्यातील मंदिरात आला; देवाला हात जोडले अन् मग तिथेच नको ते कांड, पण एक चूक अन् 48 तासात झाला 'गेम'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल