TRENDING:

How to Wash Nonveg : तुम्ही नॉनव्हेज शिजवण्यापूर्वी नळाखाली धुताय का? संशोधक म्हणतात ही सर्वात मोठी चूक

Last Updated:
आपल्याला वाटतं की पाण्याने धुतल्यामुळे त्यातील घाण आणि जंतू निघून जातील. पण, सावधान! तुमची हीच 'स्वच्छतेची सवय' तुमच्या कुटुंबाला गंभीर आजारांच्या विळख्यात ढकलू शकते.
advertisement
1/10
तुम्ही नॉनव्हेज शिजवण्यापूर्वी नळाखाली धुताय? संशोधक म्हणतात ही सर्वात मोठी चूक
स्वयंपाकघरात पाऊल टाकलं की, स्वच्छता ही आपली पहिली प्राथमिकता असते. विशेषतः चिकन किंवा मटण सारखे नॉनव्हेज पदार्थ बनवताना आपण ते नळाखाली धरून स्वच्छ धुतो. आपल्याला वाटतं की पाण्याने धुतल्यामुळे त्यातील घाण आणि जंतू निघून जातील. पण, सावधान! तुमची हीच 'स्वच्छतेची सवय' तुमच्या कुटुंबाला गंभीर आजारांच्या विळख्यात ढकलू शकते.
advertisement
2/10
जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि अन्न सुरक्षा तज्ज्ञांनी दिलेला हा इशारा वाचल्यानंतर, तुम्ही पुन्हा कधीही नॉनव्हेज धुण्याची चूक करणार नाही.
advertisement
3/10
अनेक घरांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक पद्धत म्हणजे बाजारातून मांस आणलं की ते आधी नळाखाली स्वच्छ धुवायचं. "रक्त आणि घाण निघून गेली की चिकन सुरक्षित होतं," असा आपला समज असतो. मात्र, आधुनिक विज्ञान आणि CDC (Centers for Disease Control and Prevention) यांसारख्या नामांकित संस्था या सवयीला 'सर्वात मोठी चूक' मानतात.
advertisement
4/10
आता तुम्ही विचार करत असाल की असं का? पाण्याने तर सगळ्या गोष्टी साफ होतात, मग चिकन-मटणाचा काय प्रॉबलम आहे.
advertisement
5/10
1. 'बॅक्टेरिया'चा प्रसार (The Splash Effect)जेव्हा तुम्ही कच्चं मांस (Raw Meat) नळाच्या वाहत्या पाण्याखाली धरता, तेव्हा पाण्याचे तुषार उडतात. हे तुषार उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत, पण ते तुमच्या सिंकमध्ये, ओट्यावर, जवळ ठेवलेल्या भांड्यांवर आणि अगदी तुमच्या हातावरही उडतात. कच्च्या मांसामध्ये 'कॅम्पिलोबॅक्टर' (Campylobacter) आणि 'साल्मोनेला' (Salmonella) सारखे घातक बॅक्टेरिया असतात. पाण्यासोबत हे जंतू सर्वत्र पसरतात, ज्याला विज्ञानात 'क्रॉस-कंटॅमिनेशन' (Cross-Contamination) म्हणतात.
advertisement
6/10
2. अन्नातून विषबाधा (Food Poisoning)संशोधनानुसार, वाहत्या पाण्यामुळे मांस स्वच्छ होण्याऐवजी त्यातील जंतू 3 ते 5 फुटांच्या परिसरात पसरतात. जर तुमच्या ओट्यावर फळं किंवा भाज्या असतील, तर हे बॅक्टेरिया तिथेही पोहोचतात. यामुळे जुलाब, उलट्या आणि पोटाचे गंभीर विकार होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.
advertisement
7/10
तज्ज्ञ काय सांगतात? (Expert Research Reference)Drexel University (USA) यांच्या 'Don't Wash Your Chicken' या मोहिमेनुसार, मांस धुतल्याने त्यावरील बॅक्टेरिया मरत नाहीत. उलट, ते किचनमधील इतर पृष्ठभागावर पसरून संसर्गाचा धोका वाढवतात.
advertisement
8/10
UK ची NHS संस्था:नॅशनल हेल्थ सर्व्हिसने (NHS) देखील स्पष्ट केले आहे की, कच्च्या मांसातील बॅक्टेरिया फक्त उच्च तापमानावर शिजवल्यानेच मरतात, पाण्याने धुतल्याने नाही.
advertisement
9/10
मग सुरक्षित मार्ग कोणता?जर तुम्हाला मांस न धुता शिजवणं पटत नसेल, तर तज्ज्ञांनी सुचवलेले हे उपाय पाळा-थेट शिजवा: मांस किमान 75°C तापमानावर शिजवल्यास सर्व बॅक्टेरिया आपोआप नष्ट होतात.-नळाखाली धरणे: थेट फोर्सने पाणी सोडून मांस धुणे टाळा. एका स्वच्छ भांड्यांत पाणी घेऊन मग त्यात चिकन-मटण टाकून तुम्ही हळूहळू साफ करु शकता.-मांस स्वच्छ करताना आजूबाजूला खाण्याचे इतर पदार्थ ठेवू नका.-मांसाला स्पर्श केल्यानंतर लगेच २० सेकंद साबणाने हात स्वच्छ धुवा.-नॉनव्हेजसाठी वापरलेला चाकू आणि बोर्ड दुसरं काही कापण्यासाठी वापरू नका.
advertisement
10/10
आपल्या पूर्वजांनी 'अग्नी'ला शुद्ध मानलं आहे आणि विज्ञानानेही त्यावर शिक्कामोर्तब केलंय. कच्च्या मांसातील जंतू काढण्यासाठी पाणी नाही, तर 'योग्य तापमान' महत्त्वाचे आहे. त्यामुळे पुढच्या वेळी नॉनव्हेज बनवताना वरील काळजी घ्या आणि व्यवस्थित शिजवा. तुमची ही एक छोटी सावधगिरी तुमच्या कुटुंबाला मोठ्या आजारांपासून वाचवू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
How to Wash Nonveg : तुम्ही नॉनव्हेज शिजवण्यापूर्वी नळाखाली धुताय का? संशोधक म्हणतात ही सर्वात मोठी चूक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल