Team India : अभिषेकने 'वर्ल्ड कप' सोडला? पॉवर प्लेमध्येच 4 चुका, टीम इंडियाचा घात करणार!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध होत आहे. या सामन्यात भारताने पॉवर प्ले म्हणजेच पहिल्या 6 ओव्हरमध्ये तब्बल 4 चुका केल्या आहेत, ज्या टीमला महागात पडू शकतात.
advertisement
1/7

टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलला पोहोचण्यासाठी टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना जिंकावाच लागणार आहे. अन्यथा टीम इंडियाचं आव्हान सुपर-8 मध्येच संपुष्टात येईल.
advertisement
2/7
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. इडन गार्डनचं मैदान रनचा पाठलाग करण्यासाठी ओळखलं जातं. खेळपट्टी पाठलाग करण्यासाठी चांगली आहे, अशी प्रतिक्रिया सूर्यकुमार यादवने दिली.
advertisement
3/7
या सामन्यात टीम इंडियाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. कुलदीप यादवचं वेस्ट इंडिजविरुद्धचं रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. कुलदीप हा वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय बॉलर आहे. तसंच वेस्ट इंडिजला कुलदीपचा स्पिन समजण्यातही अडचणी येतात, तरी त्याला संधी मिळाली नाही.
advertisement
4/7
वेस्ट इंडिजची बॅटिंग ही नवव्या क्रमांकापर्यंत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वेस्ट इंडिजच्या 7 विकेट गेल्या होत्या, तरी त्यांनी मोठा स्कोअर उभारला. हे माहिती असूनही सूर्याने बुमराहला पहिली ओव्हर दिली नाही.
advertisement
5/7
बुमराह हा टीम इंडियाचा सगळ्यात मोठा विकेट टेकिंग बॉलर आहे. महत्त्वाच्या सामन्यात सुरूवातीलाच बुमराहला बॉलिंग देऊन वेस्ट इंडिजला अडचणीत आणण्याची संधी टीम इंडियाकडे होती, पण ही संधी टीमने वाया घालवली.
advertisement
6/7
तिसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर रोस्टन चेसने वरुण चक्रवर्तीच्या दिशेने बॉल मारला, यानंतर चेस आणि शाय होप यांच्यात गोंधळ झाला आणि दोघं खेळपट्टीच्या मध्ये आले, पण वरुण चक्रवर्तीने दोघांकडे न पाहताच थ्रो केला ज्यामुळे रन आऊटची हातात आलेली संधी फुकट गेली.
advertisement
7/7
पाचव्या ओव्हरच्या पाचव्या बॉलला रोस्टन चेसला आणखी एक जीवनदान मिळालं. जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगवर रोस्टन चेस मोठा शॉट मारायला गेला, पण अभिषेक शर्माने हातातला कॅच सोडला. पॉवर प्लेमध्येच टीम इंडियाने या चार चुका केल्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : अभिषेकने 'वर्ल्ड कप' सोडला? पॉवर प्लेमध्येच 4 चुका, टीम इंडियाचा घात करणार!