TRENDING:

थलापतीच्या संसाराचा खेळखंडोबा! पत्नीच्या गंभीर आरोपांनंतर आता मुलानेही फिरवली पाठ, विजयच्या आयुष्यातील वाद चव्हाट्यावर

Last Updated:
Thalapathy Vijay: या संपूर्ण वादात चाहत्यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे तो विजयच्या मुलाच्या वागणुकीमुळे. कुटुंबातील या बेबनावामुळे जेसनने आपल्या वडिलांच्या विरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जातंय.
advertisement
1/9
पत्नीच्या आरोपांनंतर आता मुलानेही फिरवली पाठ,विजयच्या आयुष्यातील वाद चव्हाट्यावर
तमिळ सिनेसृष्टीचा सुपरस्टार आणि आता राजकीय मैदानात उतरलेला थलापती विजय सध्या आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगातून जात आहे. पडद्यावर संकटांचा सामना करणारा हा हिरो खऱ्या आयुष्यात मात्र पूर्णपणे कोलमडलेला दिसत आहे.
advertisement
2/9
पत्नी संगीता सोर्णलिंगम हिने घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतल्याने आधीच खळबळ उडाली होती, पण आता या वादात त्यांच्या मुलाची, म्हणजेच जेसन संजयची एन्ट्री झाल्याने प्रकरणाला गंभीर वळण मिळालं आहे.
advertisement
3/9
२५ वर्षांच्या सुखी संसारानंतर संगीताने चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. या अर्जात तिने विजयवर लावलेले आरोप थक्क करणारे आहेत. संगीताच्या म्हणण्यानुसार, एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विजयचे संबंध असून, वारंवार समज देऊनही विजयने ते नातं तोडलं नाही.
advertisement
4/9
उलट, जाब विचारल्यावर विजयने संगीतावरच अनेक बंधनं लादली आणि तिला घरातच परकं करून टाकलं. १९९९ मध्ये ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतीने मोठ्या थाटामाटात झालेल्या या लग्नाचा अंत इतका कडवट असेल, असं कुणालाही वाटलं नव्हतं.
advertisement
5/9
या संपूर्ण वादात चाहत्यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे तो विजयच्या मुलाच्या वागणुकीमुळे. सोशल मीडियावर सध्या एका गोष्टीची तुफान चर्चा आहे, ती म्हणजे विजयचा मुलगा जेसन संजय याने घेतलेला पवित्रा.
advertisement
6/9
जेसन सध्या परदेशात चित्रपट दिग्दर्शनाचे शिक्षण घेत आहे आणि तो आपल्या आईच्या खूप जवळ असल्याचं मानलं जातं. कुटुंबातील या बेबनावामुळे जेसनने आपल्या वडिलांच्या विरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जातंय.
advertisement
7/9
विजयचा मुलगा जेसनने त्याच्या वडिलांना इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अनफॉलो केलं आहे. यानंतर संगीताच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याच्या चर्चा सिनेसृष्टीत पसरल्या आहेत.
advertisement
8/9
विजय सध्या आपल्या करिअरमधील शेवटच्या चित्रपटात व्यग्र असून, त्यानंतर तो पूर्णवेळ राजकारणात सक्रिय होणार आहे. 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) या पक्षाच्या माध्यमातून तो २०२६ ची निवडणूक लढवणार आहे.
advertisement
9/9
अशा मोक्याच्या क्षणी घरात सुरू असलेलं हे वादळ त्याच्या राजकीय प्रतिमेसाठी घातक ठरू शकतं. "जो स्वतःचा संसार सांभाळू शकला नाही, तो राज्य काय सांभाळणार?" असे बोचरे प्रश्न विरोधकांकडून विचारले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
थलापतीच्या संसाराचा खेळखंडोबा! पत्नीच्या गंभीर आरोपांनंतर आता मुलानेही फिरवली पाठ, विजयच्या आयुष्यातील वाद चव्हाट्यावर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल