Weather Alret : मार्चच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रावर संकट, उष्णतेचा पारा वाढणार, हवामान खात्याचा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात 2-4 अंशांनी मुख्यतः कोरडे, उष्ण आणि निरभ्र राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
advertisement
1/7

राज्यात फेब्रुवारी महिन्यात उष्णतेचा पारा वाढलेला पाहायला मिळाला. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात 2-4 अंशांनी मुख्यतः कोरडे, उष्ण आणि निरभ्र राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
advertisement
2/7
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये दमट आणि उष्ण हवामान कायम राहील. मुंबईत कमाल तापमान 29-32 अंश सेल्सिअस तर किमान 23-25 अंश राहील. आर्द्रता जास्त असल्याने उकाडा तीव्र जाणवेल.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये कोरडे आणि उष्ण वातावरण राहील. पुण्यात कमाल 32-34 अंश, किमान 15-18 अंश राहील.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये तापमानात वाढ होईल. नाशिकमध्ये दिवसा 33-35 अंश, रात्री 17-20 अंश तापमान राहील.
advertisement
5/7
मराठवाड्यातील जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, धारशिवमध्ये उष्ण आणि कोरडे हवामान राहील. कमाल 34-36 अंशांपर्यंत, किमान 18-21 अंश राहील.
advertisement
6/7
विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणामध्ये सर्वाधिक उष्णता जाणवेल. कमाल 35-38 अंश, किमान 20-23 अंश राहील. पूर्व विदर्भात थंडी जवळपास संपली आहे. उन्हाचा तडाखा तीव्र असेल. उष्णतेशी संबंधित आजारांपासून सावध राहा.
advertisement
7/7
एकंदरीत, 1 मार्चला महाराष्ट्रात उन्हाळ्याची जोरदार सुरुवात दिसत आहे. नागरिकांनी भरपूर द्रवपदार्थ प्या, सूर्यप्रकाश टाळा,
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alret : मार्चच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रावर संकट, उष्णतेचा पारा वाढणार, हवामान खात्याचा अलर्ट