बापाचं छत्र हरपलं, ती हरली नाही! ६ किमी पायपीट, चंदगडच्या लेकीने खाकी वर्दी मिळवून सर्वांची मनं जिंकली
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
चंदगडच्या प्रियांका पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत एमपीएससीद्वारे पोलीस उपनिरीक्षक पद मिळवले आणि प्रबोधिनीत ५ पुरस्कारांसह 'रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर' मिळवला.
advertisement
1/6

वडिलांना गमावलं घरातला सर्वात मोठा आधारस्तंभ गेला. आता करायचं काय, पण हरुन न जाता तिने परिस्थितीशी लढायचं ठरवलं. जिद्दीच्या जोरावर तिने खाकी वर्दीचा मान मिळवला. इतकंच नाही तर तब्बल ट्रेनिंगदरम्यान 5 गोष्टींसाठी तिला मेडल देखील मिळाले. या तरुणीचा संघर्ष सोपा नक्कीच नव्हता. चंदगडसारख्या अगदी छोट्या गावातून आलेल्या लेकीच्या संघर्षाची ही कहाणी आहे.
advertisement
2/6
चंदगड तालुक्यातील जक्कनहट्टी येथील प्रियांका पाटील यांनी अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर एकापाठोपाठ एक तब्बल ५ पुरस्कार पटकावून 'सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी' होण्याचा बहुमान मिळवला. प्रियांका पाटील यांनी केवळ प्रशिक्षण पूर्ण केले नाही, तर प्रबोधिनीचा सर्वात मानाचा ‘रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर’ हा पुरस्कार आपल्या नावावर केला.
advertisement
3/6
जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. प्रियांका यांनी खालील विभागांत आपले वर्चस्व सिद्ध केले: १. रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर (सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी) २. बेस्ट ट्रेनी (सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थी) ३. सर्वोत्कृष्ट कायदा (कायद्याचा सखोल अभ्यास) ४. सर्वोत्कृष्ट अभ्यास (शैक्षणिक कामगिरी) ५. सर्वोत्कृष्ट कवायत (ड्रिलमध्ये अव्वल)
advertisement
4/6
प्रियांका यांचं हे यश सहज मिळालेली गोष्ट नाही. त्यांच्या यशाच्या पायात संघर्षाचे अनेक काटे बोचलेले आहेत. लहानपणीच वडिलांचे निधन झाल्यानंतर घरातील कर्ता पुरुष गेला आणि कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र, प्रियांकाच्या आईने हार मानली नाही. त्यांनी कष्ट करून आपल्या लेकीला शिकवलं.
advertisement
5/6
शालेय शिक्षणासाठी प्रियांका यांना रोज ६ किलोमीटरची पायपीट करावी लागत असे. घरची परिस्थिती बेताची, हातात साधने मर्यादित, पण डोळ्यांत पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न होते. प्रियांका यांनी आधी बी. फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले. फार्मसी क्षेत्रात चांगले करिअर करण्याची संधी असतानाही त्यांनी पोलीस दलाची निवड केली.
advertisement
6/6
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी एमपीएससीच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. नाशिकच्या प्रबोधिनीत ३८९ प्रशिक्षणार्थींमध्ये (३२२ पुरुष आणि ६७ महिला) प्रियांका यांनी दाखवलेली चमक थक्क करणारी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Success Story/
बापाचं छत्र हरपलं, ती हरली नाही! ६ किमी पायपीट, चंदगडच्या लेकीने खाकी वर्दी मिळवून सर्वांची मनं जिंकली