TRENDING:

T20 World Cup : कॅप्टन सूर्याचा मास्टरस्ट्रोक, सुपर-8 आधी एका निर्णयाने फिरवली अख्खी मॅच!

Last Updated:

नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा 17 रननी विजय झाला आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा 17 रननी विजय झाला आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण सुरूवातीलाच टीम इंडिया अडचणीत आली. ओपनर अभिषेक शर्मा हा पुन्हा एकदा शून्य रनवर आऊट झाला, त्यानंतर इशान किशनही 18 रन करून माघारी परतला. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी भारताची पडझड रोखली.
कॅप्टन सूर्याचा मास्टरस्ट्रोक, सुपर-8 आधी एका निर्णयाने फिरवली अख्खी मॅच!
कॅप्टन सूर्याचा मास्टरस्ट्रोक, सुपर-8 आधी एका निर्णयाने फिरवली अख्खी मॅच!
advertisement

सूर्यकुमार यादवने 34 आणि तिलक वर्माने 31 रनची खेळी केली. तिलक वर्मा आऊट झाला तेव्हा सूर्यकुमार यादव मैदानात होता, तेव्हाच सूर्याने गड आऊटच्या दिशेने इशारा करून हार्दिकऐवजी शिवम दुबेला बॅटिंगला पाठवायला सांगितलं, यानंतर दुबे बॅटिंगला आला आणि त्याने नेदरलँड्सच्या बॉलिंगवर आक्रमण केलं.

शिवम दुबेने 31 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 4 फोरच्या मदतीने 66 रनची खेळी केली, ज्यामुळे टीम इंडियाचा स्कोअर 193/6 एवढा झाला. यानंतर शिवम दुबेने बॉलिंगमध्येही 2 विकेट घेतल्या. या ऑलराऊंड कामगिरीबद्दल शिवम दुबेला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. याशिवाय वरुण चक्रवर्तीने 3 ओव्हरमध्ये फक्त 14 रन देऊन 3 विकेट घेतल्या. बुमराह-हार्दिकला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

advertisement

दुबे-हार्दिकची पार्टनरशीप

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
...तर खरी शिवजयंती साजरी होईल, शिव व्याख्याते बांगर यांचं परखड भाष्य, Video
सर्व पहा

शिवम दुबेची टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली ही सर्वोत्तम खेळी होती. एवढच नाही तर त्याने हार्दिक पांड्यासोबत 76 रनची पार्टनरशीपही केली. पांड्याने 21 बॉलमध्ये 3 सिक्सच्या मदतीने 30 रन केले. टी-20 वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाने 4 पैकी सर्व 4 मॅच जिंकल्या. भारताने युएसए, नामिबिया, पाकिस्तान आणि नेदरलँड्सचा पराभव केला. याचसोबत टीम इंडिया सुपर-8 मध्येही क्वालिफाय झाली आहे. सुपर-8 मध्ये भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रविवार 22 फेब्रुवारीला होणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : कॅप्टन सूर्याचा मास्टरस्ट्रोक, सुपर-8 आधी एका निर्णयाने फिरवली अख्खी मॅच!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल