भारताने टी-20 वर्ल्ड कपमध्ये युएसए, नामिबिया, पाकिस्तान आणि नेदरलँड्सचा पराभव केला, पण मागच्या दोन सामन्यांमधली टीम इंडियाची फिल्डिंग ही अत्यंत निराशाजनक झाली आहे. तिलक वर्माने मागच्या 2 सामन्यांमध्ये 3 कॅच सोडले आहेत, यातले 2 कॅच पाकिस्तानविरुद्ध आणि एक कॅच नेदरलँड्सविरुद्ध होता.
एकीकडे 23 वर्षांचा तिलक वर्मा खराब फिल्डिंग करत असतानाच नेदरलँड्सच्या 43 वर्षांच्या खेळाडूने तिलकला लाजवेल अशी फिल्डिंग केली आहे. मुख्य म्हणजे त्याने तिलक वर्माचाच अफलातून असा कॅच पकडला आहे. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात तिलक वर्माने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रुलॉफ वेन्ड मरवा याने हवेत उडी घेत उत्कृष्ट कॅच पकडला.
advertisement
टीम इंडियाने सोडले 6 कॅच
टी-20 वर्ल्ड कपच्या मागच्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाने तब्बल 6 कॅच सोडले आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तिलक वर्माने 2, इशान किशनने 1, कुलदीप यादवने एक कॅच सोडला. तर नेदरलँड्सविरुद्ध तिलक वर्माने कॅच ड्रॉप केला. याच सामन्यात सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग यांच्यात टक्कर झाल्यामुळे आणखी एक कॅच सुटला. सुपर-8 मध्ये टीम इंडियाने त्यांची फिल्डिंग सुधारली नाही तर त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.
