दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. "आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर जय पवार यांनी विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर ब्लॅक बॉक्स सहज नष्ट होत नाहीत, त्यामुळे संपूर्ण, पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जनतेसमोर यावं, अशी मागणी केली आहे.
advertisement
महाराष्ट्रातील जनतेला या दुर्दैवी घटनेचं खरं कारण समजण्याचा पूर्ण अधिकार असल्याचंही जय पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे. तसंच, "डीआरएसला तात्काळ VSR कंपनीची उड्डाणं चालवण्यास बंदी घालून, विमानांच्या देखभालीतील संभाव्य गंभीर त्रुटींवर सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणीही जय पवार यांनी केली आहे. “Miss you Dad” असं भावनिक शब्द लिहित त्यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
जय पवार यांच्या या पोस्टनंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून, संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे.
दरम्यान, दुसरीकडे अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी देखील अपघाताबाबत शंका उपस्थित केली आहे. पायलट सुमित कपूरला कुणी ब्लॅक मेल करत होतं का? पायलटच्या मदतीने घातपात घडवून आणला का? विमान जाणीवपूर्वक विमान आदळवलं का असे गंभीर प्रश्न अजित पवारांच्या अपघातासंदर्भात रोहित पवारांनी उपस्थित केले. रोहित पवारांनी केलेल्या या सवालांमुळे घातपासंदर्भात संशयाचं धुकं जास्त गडद झाल्याची चर्चा आहे. रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत काही महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत शंका उपस्थित केली. यासंदर्भात त्यांची ही दुसरी पत्रकार परिषद होती. यावेळी त्यांनी विमानाचे पायलट सुमित कपूर, विमानातील अतिरिक्त इंधन साठा, ब्लॅक बॉक्स आणि त्याचसोबत व्हिएसआर कंपनीबाबत नवे दावे केले.
रोहित पवारांचे सवाल
- पायलटनं जाणीवपूर्वक अपघात घडवून आणला?
- पायलटचा वापर करून घातपात?
- पायलट सुमित कपूरला कुणी ब्लॅकमेल केलं होतं का?
- विमानात इंधन पूर्ण भरण्याची गरज काय होती?
- विमानात अतिरिक्त इंधन भरलं होतं का?
- स्फोटानंतर घेतलेला पेट इतका मोठा नव्हता की ज्यामुळे ब्लॅक बॉक्स जळेल
- विमानातील ब्लॅक बॉक्स असलेला भाग सुरक्षित होता, तिथल्या तांब्याच्या वायर जळाल्या नव्हत्या
- 35 कोटींची खरेदी, सद्यस्थिती विमानाची किंमत 10 कोटी पण विमान 50 कोटींचं
-अपघातात मृत्यू झाल्यास 210 कोटींचा विमा
- विम्याबाबत पायलटला माहिती होती का?
- VSR कंपनीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत का?
- 'सत्तेतील अनेकांची 'व्हीएसआर'शी जवळीक'
- 'श्वेता सिंह 'डीजीसीए'मधून मोठं रॅकेट चालवतात
- 'अद्ययावत लॅब असताना ब्लॅक बॉक्सची तपासणी बाहेर का?
- 'विमान अपघाताचा तपास मुद्दाम पुढे ढकलला जातोय का?
