Mumbai Food: चमचमीत अन् झणझणीत खायचं, तर थेट इथं जायचं, मुंबईतल्या 7 फेमस खाऊ गल्ली
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Mumbai Food: मायानगरी मुंबई हे स्वप्नांचं शहर म्हणूनच ओळखलं जातं. असं म्हणतात की मुंबईत कोण उपाशी मरत नाही. मुंबईत अगदी स्वस्तात पोटभर जेवण मिळतं. इथली खाद्यसंस्कृती देखील प्रसिद्ध आहे. तसेच इथल्या खाऊ गर्दीत देखील उत्तम दर्जाचे आणि परवडणाऱ्या किमतीत जगभरातील पदार्थ मिळतात. मुंबईतल्या 7 प्रसिद्ध खाऊ गल्ल्यांबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/7

SNDT ते क्रॉस मैदान खाऊ गल्ली: मुंबईत एसएनडीटी हे प्रसिद्ध कॉलेज आहे. इथून क्रॉस मैदानपर्यंत असलेली खाऊ गल्ली मुंबईकरांचं आवडतं ठिकाण आहे. इथलं फास्ट फूड आणि चाट खाण्यासाठी नेहमीच गर्दी अशते. पावभाजी, आलू चाट, चायनीज मंच्युरियन, कॉर्न कॉब, मिल्कशेक, फ्रुट ज्यूस, आदी विविध पदार्थ इथं मिळतात.
advertisement
2/7
खारघरची खाऊ गल्ली : ऑफिस आणि कॉलेजला जाणाऱ्यांसाठी उत्सव चौकाजवळ असलेली खारघरची खाऊ गल्ली आवडतं ठिकाण आहे. येथील भोजनालयांमध्ये वडापाव, फ्राइड राइस, डोसा, नूडल्स, मंचुरियन, लिट्टी चोखा, शॉवरमा आणि मोमोज सारखे विविध स्वादिष्ट पदार्थ मिळतात. तसेच फ्राइड मोमोज, शेझवान मोमोज, चिकन मोमोज सारखे मोमोजचे प्रकारही उपलब्ध आहेत.
advertisement
3/7
मोहम्मद अली रोड: मुंबईत मांसाहारी पदार्थांची चव चाखायची असेल तर मोहम्मद अली रोड हे बेस्ट ठिकाण आहे. इथलं नॉनव्हेज फूड फेमस आहे. शॉवरमा, मसालेदार टिक्का आणि कबाबपासून ते मऊ नान, फिरनी आणि मालपुआपर्यंत वेगवेगळे पदार्थ याठिकाणी मिळतात. मिनारा मशिदीच्या शेजारी असलेलं हे ठिकाण रमजानच्या काळात खवय्यांनी खचाखच भरलेलं असतं.
advertisement
4/7
प्रिन्सेस स्ट्रीट खाऊ गल्ली : झवेरी बाजार आणि मंगलदास मार्केटजवळ प्रिन्सेस स्ट्रीट खाऊ गल्ली आहे. हे ठिकाण मुंबईतल्या लोकप्रिय फूड स्ट्रीटपैकी एक आहे. समोसा चाट, आइस्क्रीम चाट, बदाम हलवा, जिलेबी रबडी आणि आलू पापडी असे विविध मिठाई आणि स्नॅक्सचे प्रकार इथं मिळतात. इथला ज्यूस, मिल्कशेक आणि इतर पेयं देखील चांगलीच लोकप्रिय आहेत.
advertisement
5/7
माहिमची खाऊ गल्ली : माहिमच्या दर्ग्याजवळ हे लोकप्रिय स्ट्रीट फूड डेस्टिनेशन आहे. मांसाहारी पदार्थांसाठी सर्वोत्तम म्हणून हे ठिकाणं ओळखलं जातं. कॉलेजचे विद्यार्थी, ऑफिसला जाणारे लोक आणि पर्यटकांनी ही गल्ली नेहमीच खचाखच भरलेली दिसते. खिचडा, खिरी, बैदा रोटी, रगडा चाट, चिकन तंदूरी, मोमोज, ड्राय कुल्फी फालुदा आणि आईस्क्रीम फालुदाला इथे चांगलीच मागणी असते.
advertisement
6/7
कार्टर रोड खाऊ गल्ली : कार्टर रोडची खाऊ गल्ली ही समुद्रकिनारी आहे. इथल्या थंडगार वातावरणात बसून गरमागरम पदार्थांचा आस्वाद घेता येतो. वांद्रे प्रोमेनेडजवळ असलेल्या या फूड स्ट्रीटवर दर्जेदार फूड स्टॉल्स आहेत. इथं रोल्स, मोमोज, शावरमा, फलाफल, कबाब आदी खाद्यपदार्थांचे भरपूर पर्याय मिळतात. तसेच गुलाब जामुन, फ्रोझन योगर्ट, वेफल्स अशा गोड पदार्थांची चवही इथं चाखता येते.
advertisement
7/7
घाटकोपर खाऊ गल्ली : घाटकोपर पूर्वेला मुंबईतली प्रसिद्ध खाऊ गल्ली आहे. हे ठिकाण उत्कृष्ट चवीच्या शाकाहारी पदार्थांसाठी ओळखलं जातं. इथं जिनी डोसा, मंचुरियन डोसा, चीज बर्स्ट डोसा, नूडल डोसा, मसाला डोसा, आयलँड डोसा आणि आइस्क्रीम डोसासह 45 हून अधिक प्रकारचे डोसे मिळतात. तसेच इथली पाणीपुरी, दाबेली, फाफडा, जिलेबी, कबाब, ब्रेड सँडविच, पनीर शेझवान फ्रँकी, आदी पदार्थ पाहूनच कुणाच्याही तोंडाला पाणी सुटतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Food: चमचमीत अन् झणझणीत खायचं, तर थेट इथं जायचं, मुंबईतल्या 7 फेमस खाऊ गल्ली