कोणत्याही अंतर्गत समस्यांबद्दल आपलं शरीर आपल्याला सिग्नल पाठवून सावध करण्याचा प्रयत्न करत असतं. पण, आपण अनेकदा या सिग्नलकडे दुर्लक्ष करतो, विशेषतः आपल्या पायांमधील बदल. आपल्या पायांकडे अनेकदा कमी लक्ष दिलं जातं, पण ते अनेक आरोग्याच्या समस्यांचं लक्षण देखील असू शकतात.
पायांमधील हे बदल लवकर ओळखता आले तर समस्या वाढण्यापूर्वीच त्या टाळता येतात. पायांमधील काही विशिष्ट बदला गंभीर आजारांचे संकेत असू शकतात.
advertisement
Mindful Eating : पूर्ण लक्ष देऊन खा, जाणून घ्या माईंडफुल इटिंगचं महत्त्व
व्हेरिकोज व्हेन्स - व्हेरिकोज व्हेन्स या निळ्या किंवा जांभळ्या रंगाच्या असतात, त्वचेखाली फुगलेल्या नसा असतात. ही स्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा नसांमधील झडपा कमकुवत होतात, ज्यामुळे रक्त हृदयाकडे परत जाण्याऐवजी जमा होतं. ही केवळ एक कॉस्मेटिक समस्या नाही तर नसांच्या खराब कार्याचं लक्षण देखील आहे. कधीकधी याचा संबंध डीप व्हेन थ्रोम्बोसिस नावाच्या गंभीर स्थितीशी असू शकतो, यात रक्ताच्या गुठळ्या होतात त्या जीवघेण्या असू शकतात. याची लक्षणं म्हणजे वेदना, जडपणा, खाज सुटणं आणि सूज येणं.
Restless leg syndrome - या स्थितीत पायांमध्ये एक विचित्र, अस्वस्थ संवेदना असते. पायांत मुंग्या येणं हे प्रमाण विशेषतः रात्रीच्या वेळी वाढतं. हे प्रमाण कमी करण्यासाठी, सतत पाय हलवावेत. Restless leg syndrome हे बहुतेकदा शरीराच्या आतली समस्येचं लक्षण असतं. लोहाची कमतरता, मूत्रपिंड निकामी होणं, पेरिफेरल न्यूरोपथी किंवा मधुमेह आणि पार्किन्सनसारख्या आजारांशी संबंधित असू शकतं. कधीकधी, ही लक्षणं गर्भधारणेदरम्यानही दिसू शकतात.
पायांवर जखमा - पायांवर वारंवार आणि नकळतपणे जखमा होत असतील, तर ते रक्ताशी संबंधित समस्येचं लक्षण असू शकतं. कमी प्लेटलेट्समुळेही ही लक्षण दिसू शकतात. हा रक्त पातळ करणाऱ्या औषधांचा दुष्परिणाम असू शकतो किंवा यकृताच्या आजाराचं लक्षण असू शकतं. काही प्रकरणांमधे, ते रक्ताच्या कर्करोगाचं प्रारंभिक लक्षण देखील असू शकतं.
Brain Health : लहानपणच्या संसर्गाचा मोठेपणी परिणाम होतो ? वाचा तज्ज्ञांचं मत
सेल्युलाईट - बहुतेक वेळा, सेल्युलाईट ही एक किरकोळ समस्या आहे आणि ती पुरुष आणि महिला दोघांनाही जाणवू शकते. खराब रक्ताभिसरण किंवा बिघाड असलेल्या लसीका प्रणालीचे ते संकेत असू शकतात. हार्मोनल असंतुलन आणि खराब आहाराशी देखील निगडित असू शकतं.
कधीकधी पेटके येणे सामान्य आहे, पण जर ते वारंवार आणि वेगानं होत असतील तर ते डिहायड्रेशन किंवा इलेक्ट्रोलाइट असंतुलन दर्शवू शकतात. गर्भधारणा, थायरॉईड, पेरिफेरल आर्टरी डिसीज आणि मूत्रपिंडाच्या आजाराचं देखील लक्षण असू शकतं.
