Marathi Celebs Divorce : 27 वर्षांच्या संसारानंतर थलापति विजयचा डिवोर्स, या कलाकारांच्या घटस्फोटानेही हादरली होती मराठी सिनेसृष्टी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Marathi Celebs Divorce : साऊथ अभिनेता थलापति विजयच्या डिवोर्सच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला. त्याचप्रमाणे मागील काही वर्षात मराठी मनोरंजनविश्वातही अनेक कलाकारांच्या घटस्फोटाने प्रेक्षकांना मोठा धक्का बसला होता.
advertisement
1/9

साऊथ सुपरस्टार थलापति विजयच्या आयुष्यात आयुष्यात मोठी उलथापालथ झाली. थलापती विजयचा 27 वर्षांचा संसार मोडला. विजयची बायको संगीताने त्याच्या विवाहबाह्य संबंधाचे आरोप केले आहेत.
advertisement
2/9
विजयच्या डिवोर्सच्या बातमीनं साऊथ इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. फक्त साऊथ इंडस्ट्री नाही तर मराठी मनोरंजनविश्वातही अनेक कलाकारांच्या घटस्फोटाने प्रेक्षकांना मोठा धक्का बसला होता.
advertisement
3/9
'जीव माझा गुंतला' फेम अभिनेत्री योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांचं वर्षभरात लग्न मोडलं. दोघांनी एकत्र मालिका केली. ते प्रेमात पडले, लग्न केलं आणि वर्षभरात त्यांचा डिवोर्स झाला.
advertisement
4/9
'होणार सून मी या घरची' मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांची ओळख झाली. प्रेम झालं मग त्यांनी लग्न केलं. त्याचं लग्नही काही महिन्यातच मोडलं. त्यांच्या डिवोर्सच्या बातमीनं एकच खळबळ उडाली होती.
advertisement
5/9
अभिनेत्री मानसी नाईकच्या डिवोर्सच्या बातमीने सगळ्यांना धक्का बसला होता. तिच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. पण लग्नाच्या काही महिन्यात तिचा डिवोर्स झाला. तिने नवऱ्यावर अनेक आरोप केले होते.
advertisement
6/9
शास्त्रीय गायक राहुल देशपांडेचा 17 वर्षांचा संसार मोडला. राहुल आणि नेहा कायदेशीररित्या वेगळे झाले. त्यांच्या डिवोर्सच्या बातमीनं सगळ्यांना धक्का बसला होता.
advertisement
7/9
'देवबाभळी' या नाटकातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिनं 2020 मध्ये संगीतकार आनंद ओकसोबत लग्न केलं होतं. काही वर्षांत त्यांचा डिवोर्स झाला. दुसरं लग्न करण्याच्या काही महिने आधी तिच्या डिवोर्सची बातमी समोर आली होती.
advertisement
8/9
अभिनेता सुयश आणि आयुषी भावे यांचाही डिवोर्स झाल्याची चर्चा आहे. मात्र त्यांनी अद्याप त्यावर भाष्य केलेलं नाही. इन्स्टाग्रामवर दोघांमध्ये दुरावा असल्याचं दिसतं.
advertisement
9/9
लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर देखील अनेक वर्ष सिंगल आहे. लग्नाच्या दोन वर्षांनी तिचा डिवोर्स झाला. अमेय गोसावीबरोबर तिचं लग्न झालं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Marathi Celebs Divorce : 27 वर्षांच्या संसारानंतर थलापति विजयचा डिवोर्स, या कलाकारांच्या घटस्फोटानेही हादरली होती मराठी सिनेसृष्टी