PAK vs SL : मॅच संपायच्या आधीच पाकिस्तानचं पॅकअप! 16 ओव्हरच्या 5व्या बॉलला न्यूझीलंडला मिळाले सेमी फायनलचे तिकीट
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
श्रीलंकेसमोर 213 धावांचे लक्ष्य असले तरी पाकिस्तानला त्यांना 147 धावांच्या आत रोखायचे होते.कारण पाकिस्तानला या सामन्यात 64 हून अधिक धावांनी विजय मिळवायचा होता.
advertisement
1/6

टी20 वर्ल्डकपमध्ये आज पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 212 धावा केल्या होत्या. त्यामुळे श्रीलंकेसमोर 213 धावांचे लक्ष्य होते.
advertisement
2/6
पाकिस्तानकडून साहिबजादा फरहान आणि फकर जमान या दोघांनी मिळून 176 धावांची सर्वाधिक पार्टनरशीप केली होती.ही टी20 वर्ल्डकपमधली आतापर्यतची सर्वाधिक पार्टनरशीप होती.
advertisement
3/6
फकर जमानच्या 84 धावा आणि साहिबजादा फरहानच्या शतकीय खेळीच्या बळावर पाकिस्तानने 212 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे श्रीलंकेसमोर 213 धावांचे लक्ष्य आहे.
advertisement
4/6
दरम्यान श्रीलंकेसमोर 213 धावांचे लक्ष्य असले तरी पाकिस्तानला त्यांना 147 धावांच्या आत रोखायचे होते.कारण पाकिस्तानला या सामन्यात 64 हून अधिक धावांनी विजय मिळवायचा होता.पण श्रीलंकेने आता 147 धावांचा आकडा पार केल्याने पाकिस्तान धक्का बसला आहे.
advertisement
5/6
आता पाकिस्तान जरी हा सामना जिंकली तरी सेमी फायनलला पोहोचू शकणार नाही आहे. कारण त्यांना ज्या 64 धावांनी विजय मिळवून त्यांचा रनरेट वाढवायचा होता. पण आता हे शक्य होणार नसल्याने पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर झाली आहे
advertisement
6/6
पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर झाल्याने आता न्यूझीलंड सेमी फायनलला पोहोचली.त्यामुळे ग्रुप 2 मध्ये इंग्लंड नंतर न्यूझीलंड सेमी फायनलला पोहोचणारी दुसरी टीम ठरली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
PAK vs SL : मॅच संपायच्या आधीच पाकिस्तानचं पॅकअप! 16 ओव्हरच्या 5व्या बॉलला न्यूझीलंडला मिळाले सेमी फायनलचे तिकीट