TRENDING:

ज्याच्या नावाची Bigg Boss Marathi 6 साठी होती चर्चा, प्रेक्षकांचा अंदाज चुकवून अभिनेत्याची मालिकेत एन्ट्री

Last Updated:
प्रसिद्ध अभिनेत्याचं कलर्स मराठी वाहिनीवर कमबॅक झालं आहे. अभिनेत्याचं नाव बिग बॉस मराठी 6 साठी चर्चेत होतं.
advertisement
1/9
ज्याच्या नावाची BBM 6 साठी होती चर्चा, अभिनेत्याची नव्या मालिकेत एन्ट्री
बिग बॉस मराठी 6 सुरू होण्याआधी अनेक कलाकारांची नावं जोरदार चर्चेत होती. कोण घरात जाणार, कोण वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेणार याबाबत सोशल मीडियावर तर्कवितर्क लावले जात होते.
advertisement
2/9
त्यात एका लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्याचं नावही वारंवार पुढे येत होतं. मात्र प्रेक्षकांचा हा अंदाज पूर्णपणे चुकला.
advertisement
3/9
कारण बिग बॉसच्या घरात न जाता त्या अभिनेत्याने थेट मालिकेत कमबॅक करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
advertisement
4/9
हा अभिनेता म्हणजे समीर परांजपे. टेलिव्हिजनवरील उत्तम अभिनेता अशी त्याची ओळख आहे.. त्यामुळे तो बिग बॉस मराठी 6 मध्ये सहभागी होणार अशी चर्चा रंगली होती. कारण बिग बॉसच्या आधी त्याची थोडं तुझं थोडं माझं ही स्टार प्रवाहवरील मालिका संपली होती. 
advertisement
5/9
मात्र बिग बॉस सुरू असतानाच समीरने छोट्या पडद्यावर वेगळ्याच पद्धतीने कमबॅक केलं.  'मोहिनी' या मालिकेतून त्याने कलर्स मराठीवर कमबॅक केलं आहे.
advertisement
6/9
या मालिकेत तो आर के सर ही भूमिका साकारताना दिसत आहे. त्याचा हा कॅरेक्टर अहंकारी आणि प्रभावी दाखवण्यात आला आहे. सेटवर सुरू झालेली कथा जेव्हा खऱ्या आयुष्याच्या पडद्यावर उतरते, तेव्हा त्यातून अनेक नाट्यमय घडामोडी मालिकेत पाहायला मिळणार आहेत.
advertisement
7/9
याआधी समीर 'सुंदरा मनामध्ये भरली' या कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकेत काम करत होता. या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. समीरच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं होतं. मालिकेच्या यशानंतर तो काही काळ पडद्यापासून दूर राहिला.
advertisement
8/9
त्याचबरोबर समीरने स्टार प्रवाहवरील 'गोठ' या मालिकेतही महत्त्वाची भूमिका साकारली होती. या मालिकेलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे समीरची छोट्या पडद्यावरील ओळख अधिक मजबूत झाली.
advertisement
9/9
बिग बॉस मराठी 6 साठी त्याचं नाव चर्चेत असताना त्याने रिअॅलिटी शोऐवजी मालिकेत काम करणं पसंत केलं आहे.  प्रेक्षकांचा अंदाज चुकला असला तरी समीरच्या कमबॅकने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता तो नव्या मालिकेत कशी भूमिका साकारतो, प्रेक्षक त्याला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ज्याच्या नावाची Bigg Boss Marathi 6 साठी होती चर्चा, प्रेक्षकांचा अंदाज चुकवून अभिनेत्याची मालिकेत एन्ट्री
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल