Success Story : हैदराबादी दम बिर्याणी, शिक्षक नोकरी सांभाळून करतोय विक्री, महिन्याला 1 लाख कमाई
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
परंतु नोकरीतून घरखर्च भागात नसल्यामुळे त्यांनी बिर्याणीचा व्यवसाय सुरू केला असून हा व्यवसाय ते नोकरी सांभाळत करत आहेत. यातून त्यांची साधारपणे महिन्याकाठी लाखभर रुपयांची कमाई करतात.
advertisement
1/5

पिंपरी चिंचवड येथील निगडी परिसरात राहणारे समीर दिघे हे पेशाने शिक्षक आहेत. परंतु नोकरीतून घरखर्च भागात नसल्यामुळे त्यांनी बिर्याणीचा व्यवसाय सुरू केला असून हा व्यवसाय ते नोकरी सांभाळत करत आहेत.यातून त्यांची साधारपणे महिन्याकाठी लाखभर रुपयांची कमाई करतात.
advertisement
2/5
समीर दिघे पुण्यातील एका नामांकित शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मात्र पगारात घरखर्च भागत नसल्याने त्यांनी अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग शोधला. त्यांच्या आई घरून बिर्याणी बनवून विकत असल्याने समीर यांनी हा व्यवसाय पुढे नेण्याचा निर्णय घेतला .
advertisement
3/5
यांनी स्वतःचा छोटा स्टॉल सुरू केला. हा स्टॉलच त्यांच्यासाठी मोठा टर्निंग पॉईंट ठरला. आज या स्टॉलमधून समीर दिघे महिन्याला सुमारे लाखभर रुपयांची कमाई करत आहेत.
advertisement
4/5
समीर दिघे हे नोकरीवरून आल्यानंतर स्वतःचा बिर्याणी स्टॉल चालवतात. त्यांच्या स्टॉलवर हैदराबादी बिर्याणी, दम बिर्याणी, कोलकत्ता बिर्याणी अशा विविध प्रकारच्या बिर्याण्या मिळतात. बिर्याणी ते स्वतःच बनवतात.
advertisement
5/5
त्यांचा मधुकर पवळे ब्रिज जगदंब होममेड बिर्याणी हा स्टॉल क्रमांक 29, निगडी येथे आहे.कमी किमतीत जास्त क्वांटिटी मिळत असल्याने या स्टॉलला नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Success Story : हैदराबादी दम बिर्याणी, शिक्षक नोकरी सांभाळून करतोय विक्री, महिन्याला 1 लाख कमाई