TRENDING:

Puranpoli : पुरणपोळी खाल्ल्यावर गॅसेस किंवा अपचन होतं? जेवणानंतर 'हे' एक काम करा, पोट राहील हलकं

Last Updated:
होळी आणि पुरणपोळी हे समीकरण अतूट आहे. मात्र, चण्याची डाळ आणि गूळ यामुळे अनेकांना पित्त किंवा गॅसेसचा त्रास होतो. जर तुम्हालाही पुरणपोळी खाल्ल्यावर पोट जड वाटत असेल, तर औषध घेण्यापेक्षा घरगुती उपायांनी तुम्ही हा त्रास सहज दूर करू शकता.
advertisement
1/7
पुरणपोळी खाल्ल्यावर गॅसेस-अपचन होतं? जेवणानंतर 'हे' एक काम करा, पोट राहील हलकं
पुरणपोळीचा बेत म्हटला की आपण दोन घास जास्तच खातो. पण डाळ आणि मैदा हे थोडे पचायला थोडे कठीण असतात. त्यामुळे अनेकदा पुरणपोळी खाल्ल्यानंतर पोट फुगणे, गॅसेस होणे किंवा सुस्ती येणे अशा तक्रारी जाणवतात. पुरणपोळी खाल्ल्यावर हे माझ्यासोबत नेहमी होतं असं लोक म्हणतात. पण पुरणपोळी खाण्याचा मोह कोणी आवरु शकत नाही.
advertisement
2/7
अशात तुमचा होळीचा आनंद पोटाच्या तक्रारींमुळे कमी होऊ नये, म्हणून आजीच्या बटव्यामधून एक ट्रिक आणली आहे, जी तुमच्या ही पोटाची समस्या कमी करेल.
advertisement
3/7
होळी आणि पुरणपोळी हे समीकरण अतूट आहे. मात्र, चण्याची डाळ आणि गूळ यामुळे अनेकांना पित्त किंवा गॅसेसचा त्रास होतो. जर तुम्हालाही पुरणपोळी खाल्ल्यावर पोट जड वाटत असेल, तर औषध घेण्यापेक्षा घरगुती उपायांनी तुम्ही हा त्रास सहज दूर करू शकता.
advertisement
4/7
जेवणानंतर नक्की काय करावे?पुरणपोळी खाऊन झाल्यावर लगेच झोपण्याऐवजी 'बडीशेप आणि ओव्याचे' मिश्रण चावून खा. हे मिश्रण नैसर्गिक 'डायजेस्टिव्ह' म्हणून काम करते.एक चमचा बडीशेप आणि चिमूटभर ओवा हलका भाजून त्यात थोडे सैंधव मीठ मिसळा. हे मिश्रण जेवणानंतर खाल्ल्याने पोटातील गॅस त्वरित निघून जातो आणि अन्नाचे पचन सुलभ होते.
advertisement
5/7
पचन सुलभ होण्यासाठी इतर प्रभावी उपायकोमट पाणी-जेवणानंतर अर्ध्या तासाने एक ग्लास कोमट पाणी प्यावे. यामुळे डाळीचे पचन लवकर होते.सुंठ पावडर-पुरण तयार करतानाच त्यात सुंठ आणि जायफळ आवर्जून घाला. सुंठ वायूनाशक असते.वज्रासन-जेवणानंतर 10-15 मिनिटे वज्रासनात बसल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोट जड वाटत नाही.शतपावली-जेवल्याबरोबर लगेच आडवे पडू नका. किमान 100 पावले चाला.
advertisement
6/7
अतिशय महत्त्वाचे: कटाची आमटी आणि तूप!आपल्या पूर्वजांनी पुरणपोळीसोबत 'कटाची आमटी' आणि 'साजूक तूप' खाण्याची पद्धत उगीच पाडली नाही.1. कटाची आमटी: यात वापरले जाणारे आले, लसूण, मिरपूड आणि कढीपत्ता हे पचनाला मदत करतात.2. साजूक तूप: पुरणपोळीवर तूप घेतल्याने तिचा 'ग्लायसेमिक इंडेक्स' कमी होतो आणि अन्नाचा घास मऊ होऊन पचायला सोपा जातो.
advertisement
7/7
पुरणपोळी खाल्ल्यानंतर लगेच थंड पाणी किंवा शीतपेये (Cold drinks) पिऊ नका.रात्रीच्या वेळी पुरणपोळी खाणे शक्यतो टाळा, कारण रात्री पचनशक्ती मंद असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
Puranpoli : पुरणपोळी खाल्ल्यावर गॅसेस किंवा अपचन होतं? जेवणानंतर 'हे' एक काम करा, पोट राहील हलकं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल