TRENDING:

चुकीला माफी नाही, टीम इंडियाच्या रील स्टारला रियल दणका, अर्शदीपवर ICC ची मोठी कारवाई!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कप फायनल जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला आहे. आयसीसी आणि बीसीसीआयकडून खेळाडूंना कोट्यवधींचं बक्षीस देण्यात आलं आहे, पण अर्शदीपला मात्र वर्ल्ड कप जिंकूनही धक्का लागला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : लागोपाठ दुसरा टी-20 वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाने इतिहास घडवला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 रननी पराभव केला. या विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंवर फक्त शुभेच्छाच नाही तर पैशांचाही वर्षाव होत आहे. बीसीसीआयने वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूंना 131 कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. तर आयसीसीकडून टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल 27 कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे.
चुकीला माफी नाही, टीम इंडियाच्या रील स्टारला रियल दणका, अर्शदीपवर ICC ची मोठी कारवाई!
चुकीला माफी नाही, टीम इंडियाच्या रील स्टारला रियल दणका, अर्शदीपवर ICC ची मोठी कारवाई!
advertisement

बीसीसीआय आणि आयसीसीकडून खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला असला तरी टीम इंडियाचा फास्ट बॉलर अर्शदीप सिंग याला मात्र धक्का बसला आहे. फायनलमध्ये केलेल्या एका चुकीच्या कृत्यामुळे भारतीय खेळाडूला मॅच फी ची त्याची पूर्ण रक्कम मिळणार नाही. आयसीसीने अर्शदीप सिंगच्या मॅच फी पैकी 15 टक्के रक्कम कापली आहे. आयसीसी कोड ऑफ कंडक्टच्या लेव्हल 1 चे उल्लंघन केल्याप्रकरणी अर्शदीपवर कारवाई करण्यात आली आहे.

advertisement

अर्शदीप सिंग हा आयसीसी आचर संहितेच्या कलम 2.9 अंतर्गत दोषी आढळला, तसंच अर्शदीपने त्याची चूक मान्यही केली. 'आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान खेळाडूवर किंवा त्याच्या जवळ अयोग्य आणि/किंवा धोकादायक पद्धतीने बॉल (किंवा क्रिकेट उपकरणांचा कोणताही इतर भाग) फेकणे, हे नियमांचं उल्लंघन आहे', त्यामुळे अर्शदीपच्या मॅच फी पैकी 15 टक्के रक्कम कापण्यात आल्याचं आयसीसीने सांगितलं आहे. आर्थिक दंडाशिवाय अर्शदीप सिंगला पुढच्या 24 महिन्यांसाठी एक डिमेरिट पॉईंटही देण्यात आला आहे.

advertisement

मैदानात काय झालं?

न्यूझीलंडची बॅटिंग सुरू असताना 11 व्या ओव्हरमध्ये अर्शदीप बॉलिंग करत होता, तेव्हा डॅरेल मिचेलने बॉल सरळ मारला, यानंतर अर्शदीपने बॉल डॅरेल मिचेलच्या दिशेने फेकला. हा बॉल डॅरेल मिचेलच्या अंगाला लागला, त्यानंतर मिचेल चांगलाच संतापला. यानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव मिचेलजवळ गेला, तसंच अर्शदीप सिंगनेही डॅरेल मिचेलची माफी मागितली. मॅच संपल्यानंतरही अर्शदीप मिचेलकडे गेला आणि दिलगिरी व्यक्त केली, याचा व्हिडिओही समोर आला होता.

advertisement

टी-20 वर्ल्ड कपची फायनल संपल्यानंतर अर्शदीप सिंग याची अंपायर रिचर्ड एलिंगवर्थ, ऍलेक्स वार्फ, थर्ड अंपायर अल्लाहुद्दीन पालेकर, फोर्थ अंपायर एडरियन होल्डस्टॉक यांनी अर्शदीपवर आरोप लावले. अर्शदीपने आरोप मान्य केल्यामुळे मॅच रेफ्री ऍन्डी पायक्रॉफ्ट यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली नाही.

डिमेरिट पॉइंट्स म्हणजे काय?

जेव्हा एखादा खेळाडू 24 महिन्यांच्या कालावधीत चार किंवा त्याहून अधिक डिमेरिट पॉइंट्स जमा करतो, तेव्हा ते निलंबन पॉइंट्समध्ये रूपांतरित होतात, ज्यामुळे बंदी येऊ शकते. दोन सस्पेन्शन पॉइंट्स म्हणजे एक टेस्ट किंवा दोन वनडे किंवा दोन टी-20, यापैकी जे आधी येईल त्या सामन्यात खेळाडूवर बंदी घातली जाते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तोटा झाला तरी निर्णय घेतला, टरबूज लागवड ठरली फायद्याची, 8 लाखांचा नफा
सर्व पहा

डिमेरिट पॉइंट्स खेळाडू किंवा खेळाडूच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डवर लागू झाल्यापासून 24 महिन्यांपर्यंत राहतात, त्यानंतर ते काढून टाकले जातात.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
चुकीला माफी नाही, टीम इंडियाच्या रील स्टारला रियल दणका, अर्शदीपवर ICC ची मोठी कारवाई!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल