मुंबईकरांसाठी 48 तास धोक्याची घंटा, घराबाहेर न पडण्याचा इशारा, IMD कडून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात मे महिन्यासारखी परिस्थिती आली आहे. मुंबईसह राज्यात ही परिस्थिती का ओढवली, काय कारण आहे? हे जाणून घेऊया. हवामान विभागाने घराबाहेर पडू नये असा इशारा दिला आहे.
advertisement
1/6

घामाच्या धारा आणि गुदमरल्यासारखी स्थिती, किती एकदा थंड हवेत जाऊन बसावं अशी स्थिती सध्या झाली आहे. अंगाची लाहीलाही आणि अक्षरश: उकडल्यासारखी अवस्था लोकांची झाली आहे. ऐन मार्च महिन्यात उन्हाच्या प्रचंड झळा बसत आहेत. पुढचे 48 तास उत्यंत कुशल असून घराबाहेर कामाशिवाय पडू नये असा इशाराच दिला आहे.
advertisement
2/6
उत्तर कोकणात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईकरांनो घराबाहेर पडताना सावध राहा. मुंबई, पालघर आणि ठाण्यासाठी आज उष्णतेचा 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. उद्याही या झळा कायम राहण्याची शक्यता आहे.
advertisement
3/6
या मोसमातील पहिला ऑरेंज अलर्ट आज जारी करण्यात आला आहे. मुंबईत सरासरी सरासरीपेक्षा कमाल तापमान ६ डिग्री आणि डहाणूत सरासरीपेक्षा ८ डिग्री जास्त कमाल तपनाची नोंद झाली होती. तर आज याहून अधिक तापमान वाढण्याची शक्यता असून ४०% च्या वर जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
advertisement
4/6
काल विक्रोळी आणि जोगेश्वरी भागात तापमान ४० डिग्रीच्या वर तापमान नोंदवलं गेलं होतं. तर उद्या उष्ण दमट वातावरण राहण्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासाठी कोणताही इशारा नाही, वातावरण नियमित आहे.
advertisement
5/6
विदर्भात अकोला जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा पुढील दोन दिवसासाठी इशारा देण्यात आला आहे. वाशिम, अमरावती, वर्धा आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्येही तापमान ३९ अंशांच्या पुढे गेले असून, दुपारी घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे.
advertisement
6/6
स्कायमेट हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांच्या मते, सध्या राजस्थान आणि पश्चिम पाकिस्तानच्या बाजूने येणारे अँटी-सायक्लोन सक्रिय झाले आहे. यामुळे आकाशातील ढग पूर्णपणे गायब झाले असून कडक ऊन जमिनीवर येत आहे. तसेच, उत्तर-पश्चिमेकडून येणारे कोरडे आणि गरम वारे महाराष्ट्राच्या विदर्भापर्यंत पोहोचत असल्याने तापमानात अचानक मोठी वाढ झाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
मुंबईकरांसाठी 48 तास धोक्याची घंटा, घराबाहेर न पडण्याचा इशारा, IMD कडून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट