Vishakha Subhedar : '10 दिवसांनी माझ्या पोराला पाहिलं', कुवेतमध्ये अडकलेला मुलगा परत येताच विशाखा सुभेदार इमोशनल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री विशाखा सुभेदारचा मुलगा अभिनय सुभेदार कुवैतमध्ये युद्धजन्य परिस्थितीत अडकला होता. विशाखाच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मदतीने अभिनयला सुखरूप भारतात परत आणण्यात आलं.
advertisement
1/7

अभिनेत्री विशाखा सुभेदारचा मुलगा अभिनय सुभेदार युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना कुवैतमध्ये अडकला होता. तब्बल 10 दिवसांनी अभिनय सुभेदार भारतात परतला आहे.
advertisement
2/7
अभिनय कुवैतमध्ये अडकलेला असताना विशाखाने त्याला भारतात परत आणण्यासाठी व्हिडीओ शेअर करत आवाहन केलं होतं. तिच्या व्हिडीओनंतर देशाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मदतीनं अभिनयला भारतात सुखरूप परत आणण्यात आलं आहे.
advertisement
3/7
अभिनेत्री विशाखा सुभेदार आणि तिची फॅमिली अभिनयला आणण्यासाठी मुंबई एअरपोर्टवर पोहोचले. मुलाला पाहताच विशाखाने त्याला मिठी मारली. मायलेक भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. मुलगा परत आल्यानंतर आनंद व्यक्त करत प्रतिक्रिया देत विशाखा भावुक झाली.
advertisement
4/7
एबीपीशी बोलताना विशाखा म्हणाली, "मी व्हिडीओ केला होता तेव्हाही माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि आता आज आनंदाश्रू आहेत. मी पोराला जवळजवळ 10 दिवसांनी पाहिलं. कुवेतला तो ज्या हॉटेलमध्ये राहत होता तिथे जवळच मिसाईल, ड्रोन पडत असल्याचं तो सांगायचा तेव्हा मी टेन्शनमध्ये असायचे."
advertisement
5/7
"खूप घाबरले होते पण आज आता त्याला बघून खूप आनंद झालाय. तिथे नक्की काय परिस्थिती होती ते आता त्याने आल्यावर सविस्तर सांगितलं. दिवसरात्र सायरन वाजत होते ज्यामुळे भीतीचंच वातावरण होतं असं तो म्हणाला."
advertisement
6/7
विशाखाने पुढे सांगितलं, "आज 120 लोक परत आले. त्यापैकी 24 जणांचे व्हिसा अडकले होते. सरकारने सगळ्यांचं काम केलं. मुलाला कसं आणता येईल यासाठी मी तो व्हिडीओ पोस्ट केला होता आणि एकनाथ शिंदेंनी लगेच त्याची दखल घेतली."
advertisement
7/7
"कोणी म्हणत होतं की दुबईतून लगेच व्यवस्था होऊ शकते पण कुवेतमधून अवघड आहे. तिथे एअरस्पेस मिळत नव्हती त्यामुळे मी जास्त चिंतेत होते. पण सरकारने तात्काळ दखल घेतली आणि सूत्र हलवली. कुवेतचा व्हिसा नंतर सौदीचा व्हिसा हवा होता. एम्बेसीकडून सर्व व्यवस्था केली गेली. या सगळ्या यंत्रणेमुळेच आज अभिनय घरी परतला आहे त्यामुळे त्यांचे आभार",असंही विशाखा म्हणाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Vishakha Subhedar : '10 दिवसांनी माझ्या पोराला पाहिलं', कुवेतमध्ये अडकलेला मुलगा परत येताच विशाखा सुभेदार इमोशनल