या टास्कमध्ये स्पर्धकांसाठी त्यांच्या कुटुंबाकडून आलेली पत्रं देण्यात येतात. मात्र ती मिळवण्यासाठी घरातील सदस्यांना काही कठीण निर्णय घ्यावे लागतात. यावेळी अनुश्री आणि संस्कृती या दोघींना त्यांच्या आईकडून पत्र आलं होतं. पण अनुश्रीला आईचं पत्र मिळालं नाही असं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
( Bigg Boss Marathi 6 : रुचितासोबत नेमकं काय सुरू होतं? विशालने कॅमेरासमोर अखेर सगळं खरं सांगूनच टाकलं )
advertisement
पत्र न मिळाल्यामुळे अनुश्री खूपच इमोशनल होते. ती संस्कृतीला विनंती करत म्हणते, "प्लीज, प्लीज दे मला." मात्र संस्कृती तिची विनंती नाकारते. त्यानंतर अनुश्रीचा संताप अनावर होतो. ती रडू लागते आणि अक्षरशः आकांत तांडव करताना दिसते. रागाच्या भरात ती हट्ट धरते आणि जमिनीवर हात-पाय आपटत आईचं पत्र पाहिजे असल्याचं सांगते. हे सगळं पाहून घरातील सदस्य देखील रडू लागतात.
भावनांच्या भरात अनुश्री म्हणते, "मी नाही… आता नाही राहू शकत इथे यार." तिची ही अवस्था पाहून घरातील वातावरणही तणावपूर्ण झालेलं दिसतं. दुसरीकडे संस्कृती तिची बाजू मांडताना म्हणते, "मला एक चान्स पाहिजे." दोघींमधील तणाव अधिकच वाढत जातो.
यानंतर अनुश्री प्राजक्ताशी बोलताना राग व्यक्त करते. ती म्हणते, "मी आता तिलाच नॉमिनेट करणार. मी तिला आईच दाखवते आता. तिला घरीच पाठवणार आता आईकडे." अनुश्रीच्या या वक्तव्यामुळे पुढच्या नॉमिनेशनमध्ये संस्कृतीला लक्ष्य केलं जाणार असं दिसतंय. संस्कृतीचा घराबाहेर काढण्याचं चॅलेंज अनुश्रीनं घेतलं आहे.
प्रोमोच्या शेवटी घरातील हा वाद पाहत राखी सोफ्यावर बसून "आता वॉर सुरू." असं म्हणते. तिच्या या वक्तव्यामुळे पुढील भागांमध्ये अनुश्री आणि संस्कृती यांच्यातील संघर्ष आणखी वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
