TRENDING:

March Travel Tips : अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हीटीज करायला आवडतात? मार्चसाठी भारतातील 'ही' ठिकाणं आहेत बेस्ट

Last Updated:
Best destinations for adventure lovers in marach : बऱ्याच लोकांना केवळ फिरायला जाण्यापेक्षा तिथे काहीतरी अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हीटीजही करायला आवडतात. काही लोक तर मुद्दाम अशा ठिकाणी जातात, जिथे अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हीटीज उपलब्ध असतील. आज आम्ही तुम्हाला अशाच काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत.
advertisement
1/5
अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हीटी करायला आवडतात? मार्चसाठी भारतातील ही ठिकाणं आहेत बेस्ट
भारतातील काही ठिकाणं अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हीटीजसाठी प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे आता मार्च सुरु आहे आणि तुम्हाला मार्चमध्ये अशा एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर आज आम्ही सांगत असलेली ही ठिकाणं बेस्ट पर्याय आहेत. चला पाहुयात मार्चमध्ये अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हीटीज करण्यासाठी कुठे जावं.
advertisement
2/5
ऋषिकेश : हे ठिकाण धार्मिक क्रिया, योगासाठीही ओळखलं जातं. मात्र आता इथे अनेक अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हीटीजदेखील होतात. इथे तुम्हाला बंजी जंपिन, कट-कॉर्ड बंजी आणि रनिंग व्हॅली रोप सारखे रोमांचक अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हीटीज करायला मिळेल. इथे यासाठी तुम्हाला कंपन्या व्यावसायिक प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हीटीज करण्याची परवानगी देतात.
advertisement
3/5
झिरो व्हॅली : ज्या लोकांना जास्त गर्दी आवडत नाही त्यांच्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. या ठिकाणी प्रवासी सायकल भाड्याने घेऊन गावांमध्ये फिरू शकतात, इथली संस्कृती आणि शांत जीवनाचा अनुभव घेऊ शकतात. इथे मोकळ्या आकाशाखाली कॅम्पिंग करणे एखाद्या अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हीटीजइतकेच थ्रिलिंग वाटते.
advertisement
4/5
मुन्नार : मुन्नार हे ट्रेकिंग प्रेमींसाठी बेस्ट डेस्टिनेशन आहे. इथे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये हवामान आल्हाददायक असते. याठिकाणी तुम्हाला मोठमोठे चहाचे मळे सनराईज पाहणे यांसारख्या गोष्टींचा आनंद घेता येईल. हा इथे फोटोग्राफी करण्यासाठी आणि फिरण्यासाठी उत्तम असतो.
advertisement
5/5
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
March Travel Tips : अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हीटीज करायला आवडतात? मार्चसाठी भारतातील 'ही' ठिकाणं आहेत बेस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल