Kitchen Hacks : भेंडीची भाजी बनवताना 'ही' युक्ती वापरा, अजिबात चिकट होणार नाही! मुलं आवडीनं खातील
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
How to make perfect bhendi : भेंडीची भाजी घरातल्या लहान मुलांपासून ते मोठे सर्वांना आवडते. त्यामुळं ही आठवड्यातून बऱ्याचदा आपल्या घरी बनते. पण ही भेंडीची भाजी बनवायला जितकी सोपी तिकीच अवघड आहे. कारण बऱ्याचदा ती चिकट होते आणि आपल्याला त्याचं कारण काळातच नाही. पण आज आम्ही तुम्हाला यासाठी एक युक्ती सांगणार आहोत.
advertisement
1/7

शिवाय कोरडी भेंडीची भाजी डब्यात नेणंही सोपं पडतं. म्हणूनही घरात जास्त वेळा भेंडीची भाजी बनते. पण ती भाजी छान मोकळी होण्याऐवजी चिकट झाली की आपल्याला खावीशी वाटत नाही. म्हणूनच भेंडीची भाजी मोकळी आणि कोरडी होण्यासाठी आज म्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
advertisement
2/7
सर्वात आधी तर भेंडी चिरताना ओला चाकू किंवा कटिंग बोर्डवर कापू नका. कारण यामुळे भेंडीचा चिकट रस जास्त प्रमाणात बाहेर येऊ शकतो. चाकू आणि कटिंग बोर्ड दोन्ही पूर्णपणे कोरडे असावे.
advertisement
3/7
बलिया येथील रहिवासी विद्यावती देवी यांच्या मते, भेंडीची भाजी करताना थोडासा थोडासा लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर घातल्याने भेंडीचा चिकटपणा खूप कमी होतो. आंबटपणा भेंडीच्या चिकटपणावर नियंत्रण ठेवतो.
advertisement
4/7
काही लोक भेंडी शिजवताना थोडेसे व्हिनेगर घालतात. ही पद्धत देखील खूप प्रभावी आहे. व्हिनेगर भेंडीमध्ये असलेला चिकटपणा दूर करण्यास मदत करते. मात्र त्याचे प्रमाण जास्त नसावे. कारण ते डिशची चव बदलू शकते. एक चमचा व्हिनेगर देखील भेंडीचा पोत सुधारू शकतो.
advertisement
5/7
त्याचबरोबर भेंडी कमी आचेवर जास्त वेळ शिजवली तर त्यामध्ये जास्त चिकटपणा येतो. म्हणून सर्वोत्तम पद्धत म्हणजे एका पॅनमध्ये तेल चांगले गरम करणे आणि नंतर भेंडी घालणे. भेंडी जास्त आचेवर हलकी तळल्याने लवकर शिजते आणि कुरकुरीत राहते.
advertisement
6/7
काही लोक भेंडीच्या भाजीत थोडं बेसनही घालतात. बेसन भेंडीचा जास्त ओलावा आणि चिकटपणा शोषून घेते, ज्यामुळे ती कोरडी, चविष्ट आणि अधिक आकर्षक बनते. शिवाय बेसनामुळे भाजीही छान चव येते.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Hacks : भेंडीची भाजी बनवताना 'ही' युक्ती वापरा, अजिबात चिकट होणार नाही! मुलं आवडीनं खातील