उसाच्या शेतात केली मका लागवड, एका ताटाला आली आठ कणीसे, कसा केला यशस्वी प्रयोग?
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
एक प्रयोग सोलापुरातील शेतकरी मोतीराम धोडमिसे यांनी केला आहे. त्यांनी उसाच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून मक्याची शेती केली आहे.
advertisement
1/7

शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग असतात. असाच एक प्रयोग सोलापुरातील शेतकरी मोतीराम धोडमिसे यांनी केला आहे. त्यांनी उसाच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून मक्याची शेती केली आहे. या मक्याच्या प्रत्येक ताटाला तब्बल आठ कणीसे लागल्याने परिसरात या प्रयोगाची चर्चा रंगली आहे.
advertisement
2/7
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथील मोतीराम धोडमिसे यांनी आपल्या एक एकर उसाच्या शेतीत आंतरपीक म्हणून मका घेतला आहे. त्यांनी उसाच्या दोन फडांमध्ये सुमारे दोन फूट अंतर ठेवून टोकन पद्धतीने मक्याची लागवड केली आहे.
advertisement
3/7
लागवडीदरम्यान त्यांनी प्रत्येक ठिकाणी दोन बियाणे टोकन करून पेरले. या पद्धतीमुळे एका ताटाला जास्त फुटवे तयार झाले आणि परिणामी एका ताटाला तब्बल आठ कणीसे लागलेली दिसून येत आहेत.
advertisement
4/7
त्यांनी मक्याच्या वाढीसाठी 10-20 खत तसेच युरियाचा चार ते पाच पोत्यांचा डोस दिला आहे. मक्यावर अळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणीही करण्यात आली.
advertisement
5/7
सामान्यतः मक्याच्या एका ताटाला तीन ते चार कणीसे लागतात. मात्र धोडमिसे यांच्या शेतात आठ कणीसे लागल्याने हा प्रयोग विशेष ठरला आहे.
advertisement
6/7
मका या पिकाची लागवड धोडमिसे यांनी सुरुवातीला जनावरांना चारा मिळावा म्हणून केली होती. मात्र पिकाची वाढ उत्तम झाल्याने या एक एकर क्षेत्रातून सुमारे 25 ते 30 क्विंटल मक्याचे उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. यातून खर्च वजा जाता जवळपास 80 हजार रुपयांचा नफा मिळणार आहे.
advertisement
7/7
मोतीराम धोडमिसे यांना उसाच्या एक एकर लागवडीतून सुमारे दोन लाख चाळीस हजार रुपयांचा नफा अपेक्षित आहे. म्हणजेच उसात मका आंतरपीक घेतल्यामुळे धोडमिसे यांना एकूण जवळपास तीन लाख रुपयांचा फायदा होणार आहे. धोडमिसे सांगतात की, योग्य नियोजन आणि आंतरपिकांच्या माध्यमातून शेती अधिक फायदेशीर करता येते, असा सल्लाही त्यांनी इतर शेतकऱ्यांना दिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
उसाच्या शेतात केली मका लागवड, एका ताटाला आली आठ कणीसे, कसा केला यशस्वी प्रयोग?