Tips And Tricks : केमिकल्स वापरणं सोडा, वापरा होममेड नॅच्युरल मॉस्क्युटो रिपेलंट! डास कायम राहतील दूर
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
homemade mosquito repellent : ऋतू बदलला की, डासांसोबत घरात आजारपण येतं. डास वाढले की मुलांचं बाहेर गार्डनमध्ये खेळणंही अवघड होत नाही घरातही बसणं. कितीही उपाय केले तरी डास काही कमी होत नाही. अशावेळी केमिकलयुक्त स्प्रे किंवा लोशन वापरण्यापेक्षा काही घरगुती उपाय उत्तम ठरू शकतात.
advertisement
1/7

आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत, जे अत्यंत स्वस्त पण प्रभावी आहेत. हे डासांना दूर ठेवतील आणि तुमच्या आरोग्याला कोणतीच हानी पोचवणार नाही. चला तर मग पाहूया घरच्या घरी नॅच्युरल मॉस्क्युटो रिपेलंट कसं बनवायचं.
advertisement
2/7
तुम्ही लिंबू आणि लवंगचा वापरही करू शकता. यासाठी अर्ध कापलेलं लिंबू घ्या आणि त्यामध्ये 10-12 लवंगा खोचा. हे लिंबू घरातील कोपऱ्यात ठेवा. लिंबू आणि लवंगाच्या वासाने डास घरात टिकणार नाही.
advertisement
3/7
ओवा आणि मोहरीचे तेल हेदेखील हा डास घालवण्यासाठी बेस्ट आहेत. ओव्याची पावडर बनवून मोहरीच्या तेलात मिसळा. या तेलात पुठ्ठ्याचे काही तुकडे भिजवा आणि ते घरामध्ये उंच ठिकाणी ठेवा. याचा सुगंध डासांना दूर ठेवेल.
advertisement
4/7
डासांना कडुलिंबाचा वास सहन होत नाही. म्हणून तुम्ही डास घालवण्यासाठी कापराचे काही तुकडे बारीक करा आणि ते कडुलिंबाच्या तेलात मिसळा. घरात या तेलाचा दिवा लावा किंवा हे स्प्रे बॉटलमध्ये भरून वापरा. डास घालवण्यासाठी सुरक्षित आणि अधिक प्रभावी आहे.
advertisement
5/7
पुदिन्याचा वापरही तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. पुदिन्याच्या पानांचा रस काढा. त्याचे काही थेंब पाण्यात मिसळा आणि घरात स्प्रे करा. तुम्ही बाहेर जाणार असाल तर डास चौ नये यासाठी तुम्ही हे पुदिन्याचे तेल नारळाच्या तेलात मिसळून अंगावर लावू शकता.
advertisement
6/7
डास घालवण्यासाठी कडुलिंबाप्रमाणे लासूणदेखील प्रभावी असतो. लसणामध्ये असलेल्या तिखट सल्फरचा वास डासांना सहन होत नाही. यासाठी काही लसणाच्या पाकळ्या कुस्करून पाण्यात उकळा. पाणी गाळून ते स्प्रे बॉटलमध्ये टाका आणि संध्याकाळच्यावेळी कोपऱ्यांवर, पडद्यांवर आणि दारांवर स्प्रे करा.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tips And Tricks : केमिकल्स वापरणं सोडा, वापरा होममेड नॅच्युरल मॉस्क्युटो रिपेलंट! डास कायम राहतील दूर