LPG Cylinder Tips: गॅस सिलिंडर चालेल जास्त दिवस! फॉलो करा या 5 ट्रिक्स, वाचतील पैसे
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
LPG Cylinder Using Tips: स्वयंपाक घरात काही लहान-लहान बदल करुन तुम्ही गॅसची बचत करु शकतात. जेवण लवकर तयार करु शकता आणि तुमचे पैसेही वाचतील. आज आपण अशा पाच ट्रिक्स जाणून घेणार आहोत. ज्याच्या मदतीने तुमचं गॅस सिलिंडर 15-20 दिवस जास्त चालू शकेल.
advertisement
1/7

LPG Cylinder Tips: घरगुती वापरासाठी मिळणारे LPG सिलेंडरच्या रिफिलचा वेळ आता 21 दिवसांवरुन 25 दिवस करण्यात आली आहे. सुत्रांनुसार, हा निर्णय घेण्यात आला आहे कारण सिलेंडरचा गरजेपेक्षा जास्त स्टॉक लोकांनी करुन ठेवू नये.
advertisement
2/7
इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे ऊर्जा संकटाचा धोका वाढला आहे म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या स्वयंपाकघरात काही छोटे बदल करून तुम्ही गॅस वाचवू शकता, अन्न जलद शिजवू शकता आणि पैसेही वाचवू शकता? या संदर्भात, आज आम्ही पाच हॅक्स शेअर करणार आहोत जे तुमच्या गॅस सिलेंडरचे आयुष्य 15-20 दिवसांनी वाढवण्यास मदत करू शकतात...
advertisement
3/7
आग आणि भांड्यातील योग्य अंतर : जेवण तयार करताना लक्षात ठेवा की, गॅसची आग आणि भांड्यामध्ये योग्य अंतर असावं. भांडं आगीपासून खूप वर असेल तर जेवण तयार होण्यास जास्त वेळ लागू शकतो. यामुळे जास्त गॅस खर्च होतो. योग्य अंतरावर भांडं ठेवल्याने उष्णता थेट भांड्यात पोहोचते. ज्यामुळे जेवण लवकर शिजतं आणि गॅसचीही बचत होते.
advertisement
4/7
झाकणाचा योग्य वापर : नेहमी जेवण तयार करताना भांड्यावर झाकणं ठेवा. यामुळे वाफ आणि उष्णता यातच राहते, ज्यामुळे जेवण लवकर शिजतं आणि गॅसची बचत होते. डाळ, भाग, भाजीसह इतर गोष्टी झाकणाचा वापर केल्याने लवकर शिजतात आणि गॅसही जास्त लागत नाहीत.
advertisement
5/7
प्रेशर कुकरचा योग्य वापर करा : प्रेशर कुकर वापरणे हा गॅस वाचवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. प्रेशर कुकरमध्ये मसूर, तांदूळ, भाज्या किंवा सूपसारखे पदार्थ खूप लवकर शिजतात. पाण्याचे प्रमाण योग्य आहे याची खात्री करा आणि कुकरचे झाकण घट्ट बंद केले आहे जेणेकरून वाफ योग्यरित्या निर्माण होईल आणि गॅसचा वापर कमी होईल.
advertisement
6/7
साहित्य पहिलेच तयार ठेवा : गॅस चालू करण्यापूर्वी भाज्या कापून, मसाले तयार ठेवून आणि इतर गोष्टी तयार ठेवणे खुप फायदेशीर असते. यामुळे जेवण शिजवण्याचा वेळ कमी होतो आणि गॅसही विनाकारण चालू राहत नाही. पहिलेच तयारी असल्यावर गॅस जास्तवेळ ऑन राहत नाही. ज्यामुळे गॅसची चांगली बचत होते आणि कामही लवकर होतं.
advertisement
7/7
गॅस लीक आणि फ्लेमची तपासणी करा : तुमच्या गॅसची फ्लेम कमकुवत जाली असेल किंवा थोडाही गॅस लीक होत असेल तर सिलिंडर खुप लवकर संपू शकतो. यामुळे वेळोवेळी सिलेंडर आणि नॉजल चेक करत राहा. तुम्हाला फ्लेम कमी वाटत असेल तर लगेच याची तपासणी करुन घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
LPG Cylinder Tips: गॅस सिलिंडर चालेल जास्त दिवस! फॉलो करा या 5 ट्रिक्स, वाचतील पैसे