आमदार राहुल कुल यांनी वेधलं लक्ष
प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान भाजप आमदार राहुल कुल यांनी सोशल मीडियावरील बदनामीचा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे मांडला. "सोशल मीडियावर कोणाचीही बदनामी करण्यासाठी सध्या एक मोठी यंत्रणा कार्यरत आहे. अनेक फेक अकाउंट्सच्या माध्यमातून लोकांची प्रतिमा मलीन केली जाते. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच.हे अभिव्यक्ती जपण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. पण फेक अकाउंटद्वारे बदनामी थांबवण्यासाठी सरकार काही कायदा करणार आहे का, असा माझा प्रश्न असल्यााचे राहुल कुल यांनी म्हचटले.
advertisement
पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वात समिती
राहुल कुल यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी या गंभीर विषयावर सरकारची भूमिका स्पष्ट केली. "सोशल मीडियावरील बदनामी रोखण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे आवश्यक आहे. यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नेमली जाईल. ही समिती सध्याच्या कायद्यात सुधारणा करायची की नवा स्वतंत्र कायदा आणायचा, याचा सखोल अभ्यास करून सरकारला शिफारस करेल," असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.
सोशल मीडियावर फेक अकाउंटचा सुळसुळाट आणि बदनामी...
मागील काही वर्षांपासून सोशल मीडियावर अनेक फेक अकाउंट्स कार्यरत आहेत. या अकाउंट्सच्या माध्यमातून द्वेष पसरवणारा मजूकर, चिथावणीखोर वक्तव्ये, खोटी माहिती प्रसारीत केली जाते. समाजात तेढही निर्माण होत असल्याची भीती व्यक्त केली जाते. या फेक अकाउंटसवर कारवाई करण्याची मागणी अनेकदा होत असते.
