TRENDING:

Mumbai: मुंबईत मालाड रेल्वे स्टेशनच्या परिसरात दुर्घटना, इमारतीचा भाग कोसळला, घटनास्थळाचा पहिला VIDEO

Last Updated:

भांडुप रेल्वे स्टेशन परिसर हा नेहमी गर्दीने गजबजलेला असतो. या भागामध्ये स्टेशनला लागून असलेल्या प्लाझा इमारतीचा भाग कोसळला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राजेश शिंदे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील भांडुप रेल्वे स्टेशनच्या परिसरात एका इमारतीचा भाग कोसळला आहे. अत्यंत रहदारीचा असलेल्या या परिसरात इमारतीचा भाग कोसळल्यामुळे खळबळ उडाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीविताहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भांडुप रेल्वे स्टेशन परिसर हा नेहमी गर्दीने गजबजलेला असतो. या भागामध्ये स्टेशनला लागून असलेल्या प्लाझा इमारतीचा भाग कोसळला. अचानक इमारतीचा भाग कोसळ्यामुळे मोठा आवाज झाला. मोठा आवाज झाल्यामुळे एकच खळबळ उडाली.

advertisement

[video width="478" height="850" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/WhatsApp-Video-2026-03-10-at-17.19.48-2026-03-12ebab883b4479548f533930835fe31c.mp4"][/video]

भांडुप पश्चिम येथील स्टेशनजवळ झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच धावपळ उडाली. इमारतीचा स्लॅब कोसळला असल्याचं निदर्शनास आलं आहे. इमारतीखाली उभी असलेली वाहनं ढिगाराखाली सापडली.  सुदैवाने दुपारची वेळ असल्याने या ठिकाणी गर्दी कमी होती. त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळीवर स्लॅबचा ढिगार बाजूला करण्याचं काम सुरू आहे. नेमकं दुपारीची वेळ होती. संध्याकाळी या भागामध्ये चाकरमान्यांची घराकडे जाण्यासाठी मोठी गर्दी असते. त्यामुळे ऐन गर्दीच्या आधी ही घटना घडली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तोटा झाला तरी निर्णय घेतला, टरबूज लागवड ठरली फायद्याची, 8 लाखांचा नफा
सर्व पहा

प्लाझा इमारतीच्या कोसळलेला स्लॅब बाजूलाा करण्याचं काम सुरू आहे, मात्र स्लॅब का कोसळला, याचे कारण अद्याप समोर आले आहे. अग्निशमन दलाकडून सध्या बचावकार्य सुरू आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: मुंबईत मालाड रेल्वे स्टेशनच्या परिसरात दुर्घटना, इमारतीचा भाग कोसळला, घटनास्थळाचा पहिला VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल