Eating Raw Onion : जेवणासोबत कच्चा कांदा खावा की नाही? तज्ज्ञांनी सांगितलं धक्कादायक सत्य, वाचून हैराण व्हाल!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Does Eating Raw Onion Good Or Bad : बऱ्याच लोकांना जेवणासोबत कच्चा कांदा खायची सवय असते. जेव्हा घरात एखादी झणझणीत मसालेदार भाजी असते, तेव्हा तर कांदा आणि लिंबू आवर्जून खातात. पण असा कच्चा कांदा खाणं आपल्या आरोग्यासाठी खरंच चांगलं असतं का?
advertisement
1/6

कच्चा कांदा खायला काही लोकांना खूप आवडतं. पण त्याचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतोत हे जाणून घेणंही तितकंच गरजेचं असतं. वेबएमडीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, एक कप चिरलेल्या कच्च्या कांद्यामध्ये सुमारे 64 कॅलरीज आणि सुमारे 3 ग्रॅम फायबर असते. कांदा व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, पोटॅशियम आणि इतर सूक्ष्म पोषक घटकांचा चांगला स्रोत आहे
advertisement
2/6
कांद्यातील प्रीबायोटिक फायबर आतड्यांतील गुड बॅक्टेरियाचे पोषण करतात. यामुळे पचन आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. काही अभ्यासांमध्ये असं दिसलंय की, कांदा खाल्ल्याने पोट आणि कोलोरेक्टल कर्करोगासह इतर काही कर्करोगांचा धोका कमी करू शकतात.
advertisement
3/6
निरोगी व्यक्ती मर्यादित प्रमाणात कच्चा कांदा खाऊ शकतात. पोषणतज्ञांनुसार, कांद्याचे अनेक फायदे असले तरी ते कसे खाल्ले जाते हेही महत्त्वाचे आहे. शिवाय कोणाला यामुळे त्रास होऊ शकतो. हेही आपल्याला माहित असावे. कारण तज्ञांनुसार, काही लोकांनी कांदे खाणे टाळावे.
advertisement
4/6
ज्या लोकांना इरिटेबल बाउल सिंड्रोम किंवा ज्यांची पचनक्रिया खूप संवेदनशील आहे, अशा लोकांनी कांदे खाऊ नये. कारण कांद्यातील फ्रक्टन्स पोटात आंबतात आणि गॅस, पोटफुगी, पेटके किंवा सैल मल अशा निर्माण करतात. अशी माहिती वेबएमडीने दिली आहे.
advertisement
5/6
तसेच गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स रोग (जीईआरडी) किंवा वारंवार छातीत जळजळ, मायग्रेन हे त्रास किंवा कांद्याची अ‍ॅलर्जी असलेल्या लोकांनी कच्चे कांदे खाऊ नये. मात्र तुम्हाला पचनाच्या कोणत्याही गंभीर समस्या नसतील, तर दुपारच्या जेवणात सॅलड म्हणून कच्चा कांदा खाणे हा एक उत्तम पर्याय आहे. तसेच दिवसातून एकदा तुम्ही कच्चा कांदा थोड्या प्रमाणात खाऊ शकता.
advertisement
6/6
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Eating Raw Onion : जेवणासोबत कच्चा कांदा खावा की नाही? तज्ज्ञांनी सांगितलं धक्कादायक सत्य, वाचून हैराण व्हाल!