TRENDING:

प्रियकराने चरित्र्यावर आरोप केले, प्रेयसीने घरातच नको ते पाऊल उचललं, मुंबई हादरली

Last Updated:

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय MDS विद्यार्थिनीने आत्महत्या केली. पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
संकेत वरक, प्रतिनिधी, मुंबई : प्रियकराने चारित्र्यावर आरोप केल्याचे सांगत मुंबईत MDS चे शिक्षण घेत असलेल्या तरुणीने आपल्या आयुष्याचा शेवट केला. तरुणीच्या मृतदेहाजवळ सहा पानी नोट आढळून आली आहे. त्यात नमूद असलेल्या बाबींवरून दोघांमध्ये नाते असल्याचे स्पष्ट होते.
प्रियकराने चरित्र्यावर आरोप केले, प्रेयसीने घरातच नको ते पाऊल उचललं
प्रियकराने चरित्र्यावर आरोप केले, प्रेयसीने घरातच नको ते पाऊल उचललं
advertisement

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय MDS विद्यार्थिनीने आत्महत्या केली. एंटॉप हिल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. घटनास्थळावरून सहा पानांची सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली.

फुझियाल चारित्र्यावर संशय घेणारे आरोप करीत होता, नोटमधून आरोप

गलिच्छ आणि चरित्र्यावर संशय निर्माण करणारे आरोप प्रियकराने केल्याचा दावा सुसाईड नोटमध्ये प्रेयसी स्तुती सोनावणे हिने केला आहे. संबंधित तरुण मोहोम्मद फुझीयाल याचे स्तुतीसोबत संबंध असल्याचा संशय आहे. सुसाईड नोटनुसार सुरुवातीला दोघांमध्ये संबंध चांगले असल्याचे स्पष्ट झाले आहे. कालांतराने दोघांमध्ये वाद आणि भांडण होऊ लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या भांडणांदरम्यान प्रियकर फुझियाल तरुणीच्या चारित्र्यावर संशय घेणारे आरोप करीत असल्याचे स्तुतीने नोटमध्ये म्हटले आहे.

advertisement

तू एक दिवस आम्हाला फ्रीजमध्ये सापडशील... मित्र मैत्रिणी टोमणे मारायचे

सुसाईड नोटमध्ये अप्रत्यक्षपणे श्रद्धा वालकर मर्डर केसचा संदर्भ देण्यात आला आहे. तरुणीच्या मित्रमैत्रिणींकडून मस्करीत एक दिवस तू आम्हाला फ्रिजमध्ये सापडशील असे बोलले जात असल्याचा उल्लेखही सुसाईड नोटमध्ये आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तोटा झाला तरी निर्णय घेतला, टरबूज लागवड ठरली फायद्याची, 8 लाखांचा नफा
सर्व पहा

विद्यार्थिनी आई-वडील आणि बहिणीसोबत एंटॉप हिलमध्ये राहत होती. नवी मुंबईतील एका डेंटल कॉलेजमध्ये MDS चे शिक्षण घेत होती. मुलगी सकाळी सुमारे 11 वाजेपर्यंत खोलीतून बाहेर न आल्याने कुटुंबियांना संशय आला. दरवाजा तोडून पाहिले असता विद्यार्थिनी नायलॉनची ओढणी वापरून गळफास घेतल्याचे समजले. तिला तातडीने सायन रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
प्रियकराने चरित्र्यावर आरोप केले, प्रेयसीने घरातच नको ते पाऊल उचललं, मुंबई हादरली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल