TRENDING:

Chhaava Movie: 'छावा' ऑनलाइन लीक, पायरसीमुळे निर्मात्यांचं टेन्शन वाढलं, आता कमाईचं काय होणार?

Last Updated:
Chhaava Movie: छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छावा' या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
advertisement
1/7
'छावा' ऑनलाइन लीक, पायरसीमुळे निर्मात्यांचं टेन्शन वाढलं, आता कमाईचं काय होणार?
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छावा' या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह असल्यामुळे थिएटरमध्ये प्रचंड गर्दी होत आहे, आणि तिकीट मिळवणेही कठीण झाले आहे. थिएटर हाऊसफुलमुळे लोकांना तिकिटांसाठी खूप वेटिंग करावी लागत आहे.
advertisement
2/7
पहिल्या तीन दिवसांतच 'छावा'ने तब्बल 116.5 कोटींची घसघशीत कमाई केली आहे. मात्र, अशातच चित्रपट ऑनलाईन लीक झाल्याचं माहिती समोर आलीय. यामुळे सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
'छावा' पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. प्रेक्षकांना हवी ती सीट मिळत नाही, कारण सर्वच शो अगोदरच हाऊसफुल होत आहेत. चित्रपटातील भव्यदिव्य स्टारकास्ट आणि ऐतिहासिक कथानक यामुळे 'छावा'ला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.
advertisement
4/7
फिल्मीझिला आणि टेलिग्रामवरील काही चॅनल्सवर 'छावा' चित्रपट लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर त्याचे व्हायरल लिंक फिरत असल्याने अनेकांनी घरबसल्या हा चित्रपट पाहिला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे थिएटरमधील कमाईवर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
advertisement
5/7
2025 या वर्षाची दमदार सुरुवात 'छावा'ने बॉलिवूडला दिली आहे. विक्की कौशलसाठी देखील हा सिनेमा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.
advertisement
6/7
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा'साठी तब्बल 130 कोटी रुपयांचा बजेट खर्च करण्यात आला आहे. सध्या चित्रपटाच्या कमाईचा वेग पाहता हा खर्च लवकरच वसूल होईल, असे दिसत आहे. 'छावा'ने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत विक्रमी कमाई केली असून, आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की, ऑनलाईन लीकचा चित्रपटाच्या एकूण कमाईवर किती परिणाम होतो.
advertisement
7/7
'छावा'ने ऐतिहासिक कथानक, दमदार अभिनय आणि ग्रँड स्केलच्या निर्मितीमुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हा चित्रपट अजून किती मोठी कमाई करतो, हे पाहण्यासाठी सर्वांचे लक्ष लागले आहे!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Chhaava Movie: 'छावा' ऑनलाइन लीक, पायरसीमुळे निर्मात्यांचं टेन्शन वाढलं, आता कमाईचं काय होणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल