TRENDING:

Gen Z Slang Meaning : Rizz, Delulu सारख्या Gen Z च्या शब्दांचे अर्थ माहित आहेत? इथे पाहा ट्रेंडिंग Words..

Last Updated:
Gen Z Trending Slang And Their Meaning : हल्ली सोशल मीडियावर स्क्रोल करताना तुम्हाला असे अनेक शब्द ऐकायला मिळतील, ज्यांचे अर्थ उलगडणे कठीण आहे. नवीन पिढीतील जनरेशन झेडचे स्वतःचे स्लॅंग वर्ल्ड आहे, जिथे रोज नवीन शब्द जन्माला येत असतात. हे शब्द कधीकधी मजेदार, कधीकधी सर्जनशील आणि कधीकधी गोंधळात टाकणारे असतात. तुम्हालाही अशा काही शब्दांचे अर्थ माहित नसतील तर हा लेख तुमच्यासाठीच.
advertisement
1/11
Rizz, Delulu सारख्या Gen Z च्या शब्दांचे अर्थ माहित आहेत? पाहा ट्रेंडिंग Words
Iykyk : आयकिक, (If you know you know) याचा अर्थ 'जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला माहिती असेल' असा होतो. एका ग्रुपमध्ये तिसऱ्या व्यक्तीविषयी विनोद करणे. एखादी विशेष गोष्ट जी फक्त काही निवडक व्यक्तींनाच माहित असणे. उदाहरणार्थ, 'फ्राईजसाठी सर्वोत्तम ठिकाण, आयकिक'
advertisement
2/11
Delulu - डेलुलु म्हणजे भ्रामक. कल्पनारम्य जगात राहणे. जेव्हा एखाद्याला अवास्तव अपेक्षा असतात किंवा एखाद्या काल्पनिक गोष्टीत जगतात, तेव्हा जनरेशन झेड लोक त्याला डेलुलु म्हणतात. उदाहरणार्थ, 'तिला वाटते की ती सेलिब्रिटी तिला वैयक्तिकरित्या ओळखते, ती खूप डेलुलु आहे.'
advertisement
3/11
Rizz : रिझ म्हणजे आकर्षण किंवा करिझ्मा. एखादी व्यक्ती, जी इतर लोकांना खूप प्रभावित करते किंवा त्याच्याशी फ्लर्ट करते. उदाहरणार्थ, 'त्याच्याकडे रिझ आहे.' म्हणजेच त्यांच्याकडे लोकांना आकर्षित करण्याची क्षमता आहे.
advertisement
4/11
Bet : बेट म्हणजे 'ठीक आहे', 'नक्कीच', किंवा 'डील' असा होतो. उदाहरणार्थ 'तुम्ही 8 वाजता येत आहात?' 'बेट.'
advertisement
5/11
Slay : स्ले म्हणजे जेव्हा कोणी उत्कृष्ट कामगिरी करतो, आश्चर्यकारक दिसतो किंवा निर्दोषपणे काहीतरी करतो तेव्हा वापरला जाणारा शब्द. उदाहरणार्थ, 'तो पोशाख?' 'स्ले.'
advertisement
6/11
Cheugy : च्यूगी किंवा चेउगी हा शब्द अशा गोष्टींसाठी वापरला जातो, ज्या आता जुन्या वाटतात, क्रिन्ज किंवा हाय हार्ड वाटतं. उदाहरणार्थ, 'एखादी वस्तू जुनी असणे, जास्त दिखावा करणे किंवा 2026 मध्ये 2010 ची स्टाईल फॉलो करणे.'
advertisement
7/11
Stan - Stan म्हणजे एखाद्याचा खूप मोठा चाहता असणे. हा शब्द stalker आणि fan या शब्दापासून आला आहे. उदाहरणार्थ, 'I stan BTS," म्हणजे, "मी BTS चा खूप मोठा चाहता आहे.'
advertisement
8/11
Highkey - Highkey याच्या उलट आहे. याचा अर्थ काहीतरी उघडपणे व्यक्त करणे, ते लपवून न ठेवता. उदाहरणार्थ, 'I highkey want to go on that trip.'
advertisement
9/11
Lowkey - Lowkey म्हणजे काहीतरी लपवून ठेवणे. जेव्हा तुम्हाला तुमच्या भावना किंवा कृती हायलाइट करायच्या नसतात, तेव्हा तुम्ही म्हणता, "I Lowkey Like Him'
advertisement
10/11
Sus - Sus हा शब्द 'Suspicious' म्हणजेच संशयास्पद या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ जेव्हा एखादी व्यक्ती किंवा त्यांच्या कृती विचित्र किंवा संशयास्पद वाटतात. त्यांच्यासाठी हा शब्द वापरला जातो.
advertisement
11/11
Bob - जनरेशन झेड स्लॅंगमध्ये, बॉब म्हणजे 'barely over broke', म्हणजे कोणीतरी कमी पैशांमध्ये कसाबसा उदरनिर्वाह करत आहे. हे पैशाशी संबंधित विषयांमध्ये ते अनेकदा विनोदी पद्धतीने वापरले जाते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Gen Z Slang Meaning : Rizz, Delulu सारख्या Gen Z च्या शब्दांचे अर्थ माहित आहेत? इथे पाहा ट्रेंडिंग Words..
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल