Dhule News : शेतातील विहीर खचल्याने पती-पत्नी ढिगाऱ्याखाली दबले; चिमुकला वाचला, घटनास्थळाचे PHOTOS
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Dhule News : धुळ्यातील शिरपूर तालुक्यात विहीर खचल्याने पती-पत्नी ढिगाऱ्याखाली अडकल्याची घटना घडली. त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. (दिपक बोरसे, प्रतिनिधी)
advertisement
1/5

धुळे जिल्ह्याला मागील दोनतीन दिवसात पावसाने चांगलचं झोडपून काढलं आहे. मात्र, अशातच एक दुर्दैवा अपघात घडला आहे.
advertisement
2/5
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी शिवारातील शेतातील विहीर अचानक खचल्याने मोठा अपघात घडला.
advertisement
3/5
या विहिरीच्या ढिगाऱ्याखाली पती आणि पत्नी दाबले गेले आहेत. 20 ते 25 फूट मातीच्या ढिगाऱ्याखाली दोघेही गाडले गेले असून बचावकार्यासाठी जेसीबी मागवण्यात आलाय.
advertisement
4/5
रेबा पावरा आणि मीना रेबा पावरा असं या दुर्दैवी पती-पत्नीचे नाव आहेत. तर एका लहान बाळासह एक महिलेला या ढिगाऱ्यातून वाचवण्यात यश यश आलं आहे.
advertisement
5/5
या घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, परिसरातील नागरीकांनी विहिरीवर गर्दी केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/धुळे/
Dhule News : शेतातील विहीर खचल्याने पती-पत्नी ढिगाऱ्याखाली दबले; चिमुकला वाचला, घटनास्थळाचे PHOTOS