TRENDING:

Astrology: सुखाला कोणाची नजर! फेब्रुवारीत दोन खतरनाक ग्रहांचा संयोग, 5 राशींना अडचणी घाटात पकडणार

Last Updated:
Astrology:  ग्रह नक्षत्रांची स्थिती सतत बदलत राहते. फेब्रुवारी 2026 हा महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक मानला जात आहे. कुंभ राशीमध्ये सूर्य, बुध, शुक्र आणि राहु या ग्रहांची होणारी युती अनेक राशींसाठी कठीण काळ घेऊन येऊ शकते. कुंभ ही शनीची रास आहे आणि तिथे इतक्या ग्रहांची ऊर्जा एकत्रित आल्यानं तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करू शकते. विशेषतः सूर्य आणि राहुची युती शुभ मानली जात नाही.
advertisement
1/6
सुखाला नजर! फेब्रुवारीत दोन खतरनाक ग्रहांचा संयोग; 5 राशींना संकटात अडकवेल
संपूर्ण वर्षभर शनी मीन राशीत, राहु कुंभ राशीत आणि केतु सिंह राशीत राहणार आहे. या ग्रहांच्या स्थितीमुळे 5 राशींच्या व्यक्तींना फेब्रुवारी महिन्यात विशेष सावध राहण्याची गरज आहे. त्या राशी खालीलप्रमाणे..
advertisement
2/6
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ थोडा कठीण असू शकतो. कामाचा ताण अचानक वाढल्यामुळे मानसिक थकवा जाणवेल. नोकरी किंवा व्यवसायात बदलाचे संकेत मिळतील, पण हा बदल सहज नसेल. खर्च वाढल्यामुळे आर्थिक बजेट बिघडू शकते. घर आणि कार्यालय यामध्ये ताळमेळ राखणे कठीण जाईल आणि जवळच्या व्यक्तींशी मतभेद झाल्यामुळे मन अस्वस्थ राहू शकते.
advertisement
3/6
सिंह राशीवर केतुचा प्रभाव असल्याने भावनिक अस्वस्थता जाणवेल. आयुष्याच्या दिशेबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो. पूर्वी ज्या गोष्टींमध्ये आनंद वाटायचा, त्या आता ओझं वाटू लागतील. कुटुंबात संवादाचा अभाव जाणवेल आणि एखाद्या जवळच्या व्यक्तीपासून दुरावा निर्माण झाल्याने दुःख वाटू शकते. करिअरमध्ये अपेक्षेप्रमाणे निकाल न मिळाल्याने आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो.
advertisement
4/6
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ मानसिक आव्हानांचा असेल. जुन्या आठवणी आणि अपूर्ण भावना वारंवार मनात येतील. राग येईल, पण तो व्यक्त करणे कठीण जाईल. कामाच्या ठिकाणी राजकारण किंवा गैरसमजांपासून सावध राहण्याची गरज आहे. कुटुंबात तुमचे म्हणणे समजून घेतले जाणार नाही, ज्यामुळे एकटेपणा जाणवू शकतो. डोकेदुखी, तणाव आणि झोपेच्या तक्रारी त्रस्त करू शकतात.
advertisement
5/6
कुंभ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना सर्वात जास्त कठीण ठरू शकतो. स्वतःच्या राशीत अनेक ग्रहांची उपस्थिती मनाला अस्थिर बनवेल. निर्णय घेताना गोंधळ उडेल आणि आत्मविश्वास वारंवार डगमगू शकतो. कार्यक्षेत्रात विरोधक सक्रिय होण्याची शक्यता आहे. कारणाशिवाय होणारी टीका मनाला दुखावू शकते. नात्यांमध्ये गैरसमज आणि आरोग्यामध्ये थकवा व तणाव स्पष्टपणे जाणवेल.
advertisement
6/6
मीन राशीच्या लोकांसाठी शनीचा प्रभाव संथ पण दबावाचा राहील. मेहनत जास्त करावी लागेल, पण त्याचे फळ उशिरा मिळेल. आत्मविश्वासात घट होऊ शकते आणि मनात भीती किंवा असुरक्षिततेची भावना राहू शकते. पैशांशी संबंधित व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. नात्यांमध्ये भावनिक दुरावा जाणवेल. या काळात स्वतःला संयमित ठेवणे आणि शांत राहणे गरजेचे असेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: सुखाला कोणाची नजर! फेब्रुवारीत दोन खतरनाक ग्रहांचा संयोग, 5 राशींना अडचणी घाटात पकडणार
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल