मुंबईतील जुहूच्या पॉश एरियात रोहित शेट्टीचं घर आहे. याला शेट्टी टॉवर्स म्हणूनही ओळखलं जातं. ही एक 10 मजली इमारत आहे. अनेक प्रमुख बॉलिवूड स्टार्स तिथं राहत असल्याने इथं आधीच सुरक्षा कडक असते. रात्री उशिरा या परिसरात गोळीबार झाला. रोहित शेट्टीच्या घराबाहेर चार राउंड फायर करण्यात आल्या. माहिती मिळताच मुंबई पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक टीमनेही तपास सुरू केला. परिसर सील करण्यात आला असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
advertisement
दरम्यान आता या प्रकरणात पुण्यातील धायरी, वारजे आणि कर्वेनगर परिसरातून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या चौघांची पार्श्वभूमी, संपर्क आणि हालचाली संशयास्पद असल्याने पुणे पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. चौकशीदरम्यान या आरोपींचे मुंबईतील गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध असल्याचे चिन्ह दिसून आले आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही जण देशातील कुख्यात गँगशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी या आरोपींनी मुंबई क्राइम ब्रांचच्या ताब्यात दिलं आहे. आता पुढील तपास सुरू आहे.
बॉलिवूडमध्ये भीतीचं सावट! रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, 'या' कलाकारांसोबतही घडलेली भयानक घटना
या घटनेत कोणीही जखमी झालं नाही. तसंच कोणतीही मोठी जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झालं नाही.
