भाऊच्या 'धक्का'वर वहिनी फिदा; जेनिलिया रितेशला म्हणाली, 'नवरा मला तुझा...'
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बिग बॉस मराठी 5चं होस्टिंग अभिनेता रितेश देशमुख करत आहे. त्याच्या होस्टिंगनं महाराष्ट्राची मनं जिंकलीत. अभिनेत्री जेनिलियानं रितेशनं कौतुक केलं आहे.
advertisement
1/6

बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सध्या टेलिव्हिजनवर चर्चेचा विषय ठरला आहे. यंदाचा सीझन हा अनेक अर्थांनी वेगळा ठरला आहे.
advertisement
2/6
शोचा होस्ट रितेश देशमुखची वर्णी लागल्यापासून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं. रितेशच्या भाऊच्या धक्क्यानं घरातील सदस्यांना दणाणून सोडलं.
advertisement
3/6
रितेशच्या होस्टिंग सगळेच कौतुक करत आहेत. TRPमध्येही रितेशचा भाऊचा धक्का सर्वाधिक आकडे मिळवून नंबर एकवर आहे.
advertisement
4/6
रितेशच्या या यशाचं संपूर्ण महाराष्ट्र कौतुक करतच आहे पण त्याची पत्नी अभिनेत्री जेनिलिया देशमुख हिनं देखील रितेशचं कौतुक केलं आहे.
advertisement
5/6
रितेशसाठी जेनिलियानं खास पोस्ट लिहिली आहे. त्या पोस्टमध्ये तिनं लिहिलंय, "जेव्हा तू मला सांगितलंस की तू बिगबॉस मराठी होस्ट करणार आहेस. तेव्हाच मला माहिती होतं की, तू काही तरी आश्चर्यकारक करशील आणि तसंच झालं. डिअर रितेश तू सगळे रेकॉर्ड ब्रेक करत आहेस".
advertisement
6/6
जेनिलियानं पुढे लिहिलंय, "नवरा मला तुझा खूप अभिमान आहे. बिग बॉस मराठी टीम आणि कलर्स मराठी असेच पुढे जात राहा, सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन".
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
भाऊच्या 'धक्का'वर वहिनी फिदा; जेनिलिया रितेशला म्हणाली, 'नवरा मला तुझा...'