Rinku Singh : वडील वेंन्टिलेटरवर, ड्रेसिंग रुम सोडली! रिंकु सिंगच्या जागेवर झिम्बाब्वेविरुद्ध कुणाला मिळणार संधी?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Who will Replace Rinku Singh : टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकू सिंग कौटुंबिक एमर्जन्सीमुळे स्पर्धेच्या मध्यातूनच आपल्या घरी परतला असून, त्याच्या अनुपस्थितीमुळे प्लेईंग इलेव्हनबद्दल मोठा प्रश्न निर्माण झालाय.
advertisement
1/7

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारतीय संघाचा पुढचा सामना 26 फेब्रुवारी रोजी झिम्बाब्वेविरुद्ध रंगणार आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर होणाऱ्या या महत्त्वाच्या मॅचपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला.
advertisement
2/7
रिंकू सिंह याच्या वडिलांची प्रकृती अत्यंत खालावल्याने तो स्पर्धेच्या मध्येच घरी परतला आहे. रिंकू सिंह याच्या वडिलांची प्रकृती अत्यंत खालावल्याने त्यांना ग्रेटर नोएडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
advertisement
3/7
रिंकूचे झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात खेळणं आता जवळपास अशक्य मानलं जात आहे. रिंकूच्या जागी प्लेइंग 11 मध्ये कोणाला संधी मिळणार? याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलं असून संघ व्यवस्थापन आता पर्यायांचा गांभीर्याने विचार करत आहे.
advertisement
4/7
भारतीय संघाकडे रिंकू सिंह याच्या जागी खेळवण्यासाठी प्रामुख्याने दोन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय म्हणजे अक्षर पटेल याला संघात स्थान देणं. चेन्नईची खेळपट्टीवर अक्षर इफेक्टिव ठरू शकतो.
advertisement
5/7
दुसरा पर्याय म्हणजे विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन याला प्लेइंग 11 मध्ये संधी देणं. संजू सॅमसन सलामीला किंवा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो, ज्यामुळे भारताची फलंदाजी अधिक खोलवर आणि आक्रमक होऊ शकते.
advertisement
6/7
संजू नंबर पाच किंवा सहावर देखील आपली भूमिका योग्यरित्या पार पाडू शकतो. त्यामुळे सर्वांचं लक्ष संजूवर असणार आहे. शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर अशा कॉम्बिनेशनसोबत देखील टीम इंडिया उतरू शकते.
advertisement
7/7
दरम्यान, रिंकु सिंगबद्दल बीसीसीआयने अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. रिंकु सिंग उद्या दुपारपर्यंत टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर नवं आव्हान उभं रहिल्याचं दिसतंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Rinku Singh : वडील वेंन्टिलेटरवर, ड्रेसिंग रुम सोडली! रिंकु सिंगच्या जागेवर झिम्बाब्वेविरुद्ध कुणाला मिळणार संधी?