Weather Alert : महाराष्ट्रात 'तो' पुन्हा परत आलाय, बुधवारी धुमाकूळ अनेक जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
25 फेब्रुवारी रोजी बहुतांश भागात ढगाळ ते निरभ्र आकाश राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भात मात्र काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
advertisement
1/7

राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. थंडीची लाट पूर्णपणे ओसरली असून राज्यात आता उन्हाचा चटका जाणवू लागला आहे.
advertisement
2/7
25 फेब्रुवारी रोजी बहुतांश भागात ढगाळ ते निरभ्र आकाश राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भात मात्र काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
advertisement
3/7
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये 25 फेब्रुवारी रोजी मुख्यतः निरभ्र ते अंशतः ढगाळ आकाश राहील. मुंबईत कमाल तापमान 32-34 अंश सेल्सिअस आणि किमान 24-25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. सकाळी हलकी थंडी जाणवेल, मात्र दुपारी उकाडा वाढेल. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.
advertisement
4/7
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागांत कमाल तापमान 32-35 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल, तर किमान 18-22 अंश राहील. पुण्यात दुपारी उन्हाचा तडाखा जाणवेल. कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरमध्ये उष्ण आणि कोरडे वातावरण राहील.
advertisement
5/7
नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार भागात तापमानात चढ-उतार दिसेल. कमाल 32-34 अंश आणि किमान 18-21 अंश असेल. नाशिकमध्ये सकाळी थंडी जाणवेल, पण दुपारी उष्णता वाढेल.
advertisement
6/7
छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव या जिल्ह्यांत कमाल तापमान 33-36 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. किमान 20-23 अंश राहील.
advertisement
7/7
नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या भागांत सर्वाधिक उष्णता जाणवेल. कमाल तापमान 34-37 अंश सेल्सिअस आणि किमान 21-24 अंश असेल. विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये अवकाळी पावसाची शक्यता असल्यामुळे हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रात 'तो' पुन्हा परत आलाय, बुधवारी धुमाकूळ अनेक जिल्ह्यांना अलर्ट