नो ब्लाऊज लूकमध्ये प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस अंदाज, सौंदर्य पाहून चुकेल काळजाचा ठोका, PHOTOS VIRAL
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Prajakta Mali: यावेळी प्राजक्ताने एक असा लूक कॅरी केला आहे, ज्याने सोशल मीडियावर अक्षरशः आग लावली आहे. तिने चक्क ब्लाऊजशिवाय रेशमी साडी परिधान करून एक धाडसी प्रयोग केला आहे.
advertisement
1/8

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि घराघरांत पोहोचलेली लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही केवळ अभिनयासाठीच नाही, तर तिच्या हटके फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. कधी नऊवारी साडीतलं तिचं नखरेल रूप, तर कधी मॉडर्न आऊटफिटमध्ये तिचा ग्लॅमरस अवतार चाहत्यांना वेड लावतो.
advertisement
2/8
पण, यावेळी प्राजक्ताने एक असा लूक कॅरी केला आहे, ज्याने सोशल मीडियावर अक्षरशः आग लावली आहे. तिने चक्क ब्लाऊजशिवाय रेशमी साडी परिधान करून एक धाडसी आणि तितकाच मोहक प्रयोग केला आहे.
advertisement
3/8
प्राजक्ताने शेअर केलेल्या या नव्या फोटोशूटमध्ये तिने हिरव्या रंगाची रेशमी साडी नेसली आहे. या साडीचा पोत, तिची चमक आणि अंगावर पडलेले नाजूक पदराचे फोल्ड्स प्राजक्ताच्या सौंदर्याला चार चाँद लावत आहेत.
advertisement
4/8
विशेष म्हणजे, या साडीवर तिने ब्लाऊज परिधान न करता केवळ साडीचा ड्रेपिंग आणि दागिन्यांच्या जोरावर हा लूक पूर्ण केला आहे. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देणारा हा अंदाज सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला असून, चाहत्यांनी याला दाद दिली आहे.
advertisement
5/8
प्राजक्ताचा हा लूक जितका धाडसी आहे, तितकाच तो पारंपरिक दागिन्यांनी समृद्ध आहे. गळ्यामध्ये सुबक मोहनमाळ आणि बकुळी हार, कानात डुलणारे मोठे झुमके, दंडावरचा बाजूबंद आणि हातातलं जड कडं यामुळे ती एखाद्या राजघराण्यातील राणीसारखी भासत आहे.
advertisement
6/8
तिच्या हातातील कुंदनमयुरनथ आणि अंगठ्यांनी या सौंदर्याला एक वेगळीच उंची मिळवून दिली आहे. दागिन्यांचा हा साज साडीच्या नैसर्गिक सौंदर्याला अधिकच उठावदार बनवत आहे.
advertisement
7/8
मेकअप आणि हेअरस्टाईलच्या बाबतीतही प्राजक्ताने लेस इज मोर हे सूत्र वापरलं आहे. तिने आपले केस मोकळे सोडले आहेत, ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक ताजेतवाना आणि मोहक भाव दिसत आहे.
advertisement
8/8
ब्लाऊज नसल्यामुळे केसांची ही मोकळीक संपूर्ण लूकला आणखीनच सुंदर बनवत आहे. प्राजक्ताने यापूर्वीही अशा पद्धतीचा लूक ट्राय केला होता, पण हिरव्या रंगाच्या या साडीतलं तिचं हे रूप फॅशन प्रेमींना भलतंच भावलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
नो ब्लाऊज लूकमध्ये प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस अंदाज, सौंदर्य पाहून चुकेल काळजाचा ठोका, PHOTOS VIRAL