आयसीसी मेन्स t20 वर्ल्ड कप मुळे विदेशातून मोठ्या संख्येनं पर्यटक मुंबईसह विविध शहरात दाखल झाले आहेत. मात्र मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवरील स्वच्छता आणि रुळांसवळील अतिक्रमणाचे व्हिडिओ परदेशी पर्यटकांना सोशल मीडियावर शेअर केला आहे. joonazrantala असं या पर्यटकाचं इन्सटाग्राम अकाऊंट आहे.
वांद्रे रेल्वे स्थानकाच्या रुळाजवळ मोठ्या प्रमाणात उभारलेली झोपडपट्टी, प्लॅटफॉर्मवरील कचऱ्याचे ढिग आणि रुळांजवळ साचलेली घाण याची दृश्य काही पर्यटकांनी मोबाईलमध्ये चित्रित केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून मुंबईच्या सार्वजनिक व्यवस्था टीका होत आहे.
मेल एक्सप्रेस गाड्यातील प्रश्न
या परदेशी पर्यटकांनी केवळ रेल्वे स्थानकावरील कचरा आणि अतिक्रमणाची नाही तर, धावत्या मेल - एक्स्प्रेस गाडीतील परिस्थितीवरही लक्ष वेधलं आहे. विदेशी पर्यटकांनी रेल्वेगाड्यातील प्रचंड गर्दी, अस्वच्छता आणि डब्यांच्या देखभालीवर टीका केली आहे. गाडीच्या डब्यांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी उभे आहेत.
