TRENDING:

T20 World Cup : भारत-पाकिस्तानशिवायच होणार वर्ल्ड कप सेमी फायनल... नॉक आऊटला कोणत्या 4 टीम जाणार?

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप हा आता निर्णयाक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. सुपर-8 मध्ये भारत आणि पाकिस्तानला पराभवांचा धक्का बसला आहे, त्यामुळे त्यांचं सेमी फायनलला पोहोचणं कठीण झालं आहे.
advertisement
1/9
भारत-पाकिस्तानशिवायच होणार वर्ल्ड कप सेमी फायनल... नॉक आऊटला कोणत्या 4 टीम जाणार
रविवारी सुपर-8 च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 रननी पराभव झाला होता, त्यामुळे भारतीय टीमचा नेट रनरेट हा मायनस 3.800 एवढा झाला आहे.
advertisement
2/9
भारताच्या ग्रुपमधल्या वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेवर 107 रननी विजय मिळवला, यामुळेही टीम इंडियाच्या संकटात भर पडली आहे. इतक्या मोठ्या विजयामुळे वेस्ट इंडिजचा नेट रनरेट हा +5.350 इतक अवाढव्य झाला आहे.
advertisement
3/9
दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजच्या या बलाढ्य नेट रनरेटला मागे टाकणं टीम इंडियासाठी सध्या खूपच कठीण वाटत आहे, त्यामुळे भारतीय टीमला आता दक्षिण आफ्रिकेवर अवलंबून राहावं लागणार आहे.
advertisement
4/9
भारताला सुपर-8 मधल्या त्यांच्या झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन्ही मॅच जिंकाव्या लागणार आहेत. याचसोबत दक्षिण आफ्रिकेचाही वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्ध विजय व्हावा, यासाठी टीम इंडियाला प्रार्थना करावी लागणार आहे.
advertisement
5/9
भारताने उरलेले दोन्ही सामने जिंकले आणि वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला तर तिन्ही टीमचे 4-4 पॉईंट्स होतील, त्यामुळे नेट रनरेट चांगला असलेल्या दोन्ही टीम सेमी फायनलला पोहोचील, जे टीम इंडियासाठी अडचणीचं असेल.
advertisement
6/9
दुसरीकडे पाकिस्तानची अवस्थाही भारतासारखीच आहे. पाकिस्तानचा न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, त्यामुळे दोन्ही टीमना 1-1 पॉईंट देण्यात आला. यानंतर पाकिस्तानचा इंग्लंडविरुद्ध 2 विकेटनी पराभव झाला आहे. यानंतर इंग्लंड ही सेमी फायनलला पोहोचणारी पहिली टीम ठरली आहे.
advertisement
7/9
इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानलाही सेमी फायनलला पोहोचण्यासाठी इतर टीमवर अवलंबून राहावं लागणार आहे. पाकिस्तानला आता त्यांच्या शेवटच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध जिंकावच लागेल, पण पराभव झाला तर त्यांचं आव्हान संपुष्टात येईल.
advertisement
8/9
पाकिस्तानचं सेमी फायनलला पोहोचणं आता न्यूझीलंडच्या हातात आहे. न्यूझीलंडचे उरलेले दोन सामने श्रीलंका आणि इंग्लंडविरुद्ध आहेत. न्यूझीलंडने हे दोन्ही सामने गमावले आणि पाकिस्तानने श्रीलंकेवर विजय मिळवला, तर न्यूझीलंडचे 1 पॉईंट आणि पाकिस्तानचे 3 पॉईंट होतील, या परिस्थितीमध्ये पाकिस्तान सेमी फायनलला जाईल.
advertisement
9/9
पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकला आणि न्यूझीलंडने त्यांच्या 2 पैकी एक सामना गमावला तर पाकिस्तान आणि न्यूझीलंडचे समसमान म्हणजेच 3-3 पॉईंट होतील, त्यामुळे पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यात ज्यांचा नेट रनरेट चांगला असेल तरी टीम सेमी फायनलला क्वालिफाय होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : भारत-पाकिस्तानशिवायच होणार वर्ल्ड कप सेमी फायनल... नॉक आऊटला कोणत्या 4 टीम जाणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल