PAK vs ENG : घातक हत्यारानेच पाकिस्तानचा घात केला, 16 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलला मॅच कशी गमावली?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
हा सामना पाकिस्तान सहज जिंकू शकली असती. कारण सामन्यात अनेक संधी अशा आल्या होत्या जिकडे पाकिस्तान सहज हा सामना आपल्या पारड्यात पाडून घेऊ शकली असती. पण काही चुका पाकिस्तानला महागात पडल्या.
advertisement
1/7

टी20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लडने पाकिस्तानचा 2 विकेट राखून पराभव केला आहे. या विजयासह पाकिस्तान वर्ल्डकपमधून जवळपास बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. तर इंग्लंड सेमी फायनलला पोहोचणारी पहिली टीम ठरली आहे.
advertisement
2/7
पाकिस्तानने दिलेल्या 164 धावांचा इंग्लंडने 2 विकेट राखून यशस्वी पाठलाग करून हा सामना जिंकला आहे. इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार हॅरी ब्रुक ठरला आहे.कारण त्याने 100 धावांची मॅच विनिंग खेळी केली आहे.
advertisement
3/7
हा सामना पाकिस्तान सहज जिंकू शकली असती. कारण सामन्यात अनेक संधी अशा आल्या होत्या जिकडे पाकिस्तान सहज हा सामना आपल्या पारड्यात पाडून घेऊ शकली असती. पण काही चुका पाकिस्तानला महागात पडल्या.
advertisement
4/7
पाकिस्तानचा सर्वात मोठा घात त्यांच्याच ट्रम्पकार्डने केला. हा ट्रम्पकार्ड म्हणजे उस्मान तारीक.उस्मान तारीकने पहिल्या तीन ओव्हर चांगली गोलंदाजी केली होती.
advertisement
5/7
उस्मान तारीकने पहिल्या ओव्हरला 5 धावा देऊन एक विकेट काढली होती. तर दुसऱ्या ओव्हरला देखील त्याने 5 धावा देऊन एक विकेट काढली.तिसऱ्या ओव्हरला त्याने 7 धावा दिल्या.
advertisement
6/7
पण उस्मानची चौथी म्हणजेच सोळावी ओव्हर अख्खी मॅच फिरवून गेली. कारण या ओव्हरला इंग्लंडने 14 धावा काढल्या होत्या. कारण या ओव्हरला विल जॅक्सने त्याला सिक्स तर ब्रुकने चौकार मारला होता.
advertisement
7/7
या 14 धावा पाकिस्तानला खूपच महागात पडल्या आणि इथूनच पुढे त्यांची हार सूरू झाली आहे. पाकिस्तानचे आता दोन सामन्यात 1 गुण झाले आहे. शेवटचा सामना जिंकून देखील ते वर्ल्ड कपमध्ये पोहोचत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
PAK vs ENG : घातक हत्यारानेच पाकिस्तानचा घात केला, 16 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलला मॅच कशी गमावली?