शेवटच्या क्षणी ते 'तीन' वाक्य
किर्स्टी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये (जो 6 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे) सांगितलं की, मृत्यूच्या काही काळ आधी अनेक रुग्ण साधारणपणे काही ठराविक वाक्यं बोलतात.
"माझ्या कुटुंबाला सांगा की माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे."
"मला आता अजिबात चांगलं वाटत नाहीये."
"मला वाटतंय, मी आता जाणार आहे..."
advertisement
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ही वाक्यं बोलल्यानंतर काही वेळातच त्या रुग्णांचा खरोखरच मृत्यू होतो.
रिपोर्ट 'नॉर्मल' असतानाही घडणारा चमत्कार
किर्स्टी यांच्या अनुभवातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अनेकदा रुग्णाचे हार्ट रेट, ब्लड प्रेशर आणि सर्व मेडिकल रिपोर्ट सामान्य असतात. डॉक्टरांनाही तिथे कोणताही धोका दिसत नाही. पण, अचानक परिस्थिती अशी बदलते की कोणतंही औषध किंवा मशीन काम करेनासं होतं. नर्सने सांगितलं की हे तर असं आहे की, "जणू काही आत्मा शरीर सोडून जाण्याची तयारी आधीच करत असतो."
आरोग्य कर्मचाऱ्यांचेही तेच अनुभव
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जगभरातील अनेक नर्स आणि डॉक्टरांनी आपले अनुभव शेअर केले आहेत. काही 'होस्पिस' (Hospice) नर्सनी लिहिलं की, रुग्ण अनेकदा आपल्या मृत्यूचा अचूक अंदाज बांधतात. अनेकदा रुग्णांना त्यांचे मृत नातेवाईक दिसत असल्याच्या किंवा कोणीतरी न्यायला आल्याच्याही गोष्टी समोर आल्या आहेत.
विज्ञान काय सांगतं?
विज्ञानाच्या मते, जेव्हा शरीराचे अवयव निकामी व्हायला लागतात, तेव्हा मेंदू शरीराला धोक्याचे संकेत पाठवतो. यामुळे रुग्णामध्ये अस्वस्थता, भीती किंवा गोंधळ निर्माण होऊ शकतो. पण, किर्स्टी यांच्यासारख्या अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी जे पाहिलं ते केवळ शारीरिक प्रक्रियेपेक्षा काहीतरी खूप 'आध्यात्मिक' आणि खोलवर होतं.
किर्स्टी म्हणतात की, रोज मृत्यूचा सामना करणं सोपं नसतं. पण या अनुभवांनी त्यांना आयुष्याचा एक मोठा धडा शिकवला आहे. जीवन म्हणजे केवळ भौतिक वस्तू गोळा करणं नाही, तर नातेसंबंध जपणं आणि प्रेम देणं आहे. कारण शेवटच्या क्षणी आपण फक्त आठवणी आणि प्रेमच सोबत घेऊन जातो.
