TRENDING:

Weather Alert: महाराष्ट्रावर ‘अस्मानी’ संकट, 24 तास महत्त्वाचे, या जिल्ह्यांना यलो अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत हवामानाची विचित्र स्थिती जाणवत आहे. आज, 25 फेब्रुवारीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5
महाराष्ट्रावर ‘अस्मानी’ संकट, 24 तास महत्त्वाचे, या जिल्ह्यांना यलो अलर्ट
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत हवामानाची विचित्र स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. सकाळी काहीसा गारवा, दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी ढगाळ हवामानासह काही ठिकाणी पाऊस हजेरी लावत आहे. 25 फेब्रुवारीसाठी देखील हवामान विभागाने ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ विभागात विजांसह पाऊस होण्याचा अंदाज असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुरुवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 24 तास प्रामुख्याने आकाश निरभ्र राहणार असल्याचा अंदाज आहे. या भागांमध्ये पावसाचा अंदाज नाही. इथलं कमाल तापमान सुमारे 34°C, तर किमान तापमान 21°C च्या आसपास राहील. ठाणे आणि नवी मुंबईतही अशाच स्वरूपाचे हवामान राहील. कोकण किनारपट्टी भागात उष्ण आणि किंचित दमट वातावरण जाणवेल, मात्र पावसाची शक्यता कमी आहे.
advertisement
3/5
पश्चिम महाराष्ट्रात वातावरण तुलनेने स्थिर राहील. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे; मात्र बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे. काही भागांत हलक्या स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवसा तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते, तर रात्री तापमानात काहीशी घट होईल.
advertisement
4/5
मराठवाड्यात बीड, परभणी, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांत अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. कमाल तापमान 33 ते 35°C दरम्यान राहण्याची शक्यता असून किमान तापमान 20 ते 22°C च्या आसपास राहील. ढगाळ वातावरणामुळे काही भागांत दुपारचे तापमान किंचित कमी जाणवू शकते.
advertisement
5/5
विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ परिसरात अंशतः ढगाळ वातावरण राहू शकते आणि काही भागांत विजांच्या कडकडाटासह सरी पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 32 ते 34°C दरम्यान राहण्याची शक्यता असून किमान तापमान 19 ते 21°C च्या आसपास राहील. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे उष्णतेत काहीशी घट जाणवू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: महाराष्ट्रावर ‘अस्मानी’ संकट, 24 तास महत्त्वाचे, या जिल्ह्यांना यलो अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल