TRENDING:

वडिल सुपरस्टार, तरी मुलगा 200 फिल्म्समधून रिजेक्ट, 'विवाह' करताच लागली लॉटरी; आज 300 कोटींचा मालक

Last Updated:
बॉलिवूडचा फेमस अभिनेता ज्याचे वडिलही सुपरस्टार होते. पण अभिनेत्याला इंडस्ट्रीत करिअर करण्यासाठी खूप पापड लाटावे लागले. आज हा अभिनेता 300 कोटींचा मालक आहे.
advertisement
1/8
वडिल सुपरस्टार, तरी मुलगा 200 फिल्म्समधून रिजेक्ट, आज 300 कोटींचा मालक
चित्रपटसृष्टीत करिअर करणे सोपे नाही. बाहेरून ही इंडस्ट्री एक ग्लॅमरस, आलिशान दिसते. परंतु पडद्यावर छाप पाडणे हे प्रत्येकाच्याच हातात नसते. मग ते बाहेरचे असोत किंवा स्टार किड.
advertisement
2/8
स्टार किड्सचा मार्ग थोडा सोपा असतो परंतु जर ते त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकू शकले तर. नाहीत तर त्यांचं करिअर सुरू होण्यापूर्वीच संपते.
advertisement
3/8
असाच एक स्टारकिड ज्याच्यासाठी इंडस्ट्रीतला प्रवास खूप खडतर होता. त्याचे वडिल सुपरस्टार होते. पण त्याला मात्र तब्बल चारशे फिल्म्समधून रिजेक्ट करण्यात आलं. पण आज तो कोट्यवधींचा मालक आहे.
advertisement
4/8
स्टार किड असूनही त्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार अनुभवले आहेत. एक काळ असा होता जेव्हा त्याने चित्रपटांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. मग त्याच्या आयुष्यात एक सिनेमा आहे आणि त्याचं नशीब उजळलं.
advertisement
5/8
आपण बोलत आहोत तो अभिनेता म्हणजे शाहिद कपूर. वडिल पंकज कपूर बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते पण त्यांच्या मुलाला इंडस्ट्रीत येण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. शाहिदीने इश्क विश्कमधून डेब्यू केला. त्याला चॉकलेट बॉयचा टॅगही मिळाला. पण त्यानंतर चार वर्ष त्याच्याकडे काम नव्हतं. त्याला 200 फिल्म्समधून रिजेक्ट करण्यात आलं होतं. त्याने काही सिनेमात काम मिळवली पण ते सगळे फ्लॉप ठरले. त्यानंतर त्याने विवाह सिनेमात काम केलं आणि त्याचं करिअर रुळावर आलं.
advertisement
6/8
शाहिद कपूर 'इश्क विश्क' या त्याच्या पहिल्या चित्रपटातील चॉकलेट बॉय इमेजपासून ते 'कबीर सिंग' आणि 'फर्जी' सारख्या जबरदस्त भूमिकांपर्यंतचा त्याचा प्रवास खरोखरच उल्लेखनीय आहे. पण फार कमी लोकांना माहिती आहे की तो खूप आधी पडद्यावर दिसला होता. त्याने ऐश्वर्या रायच्या 'ताल' आणि 'दिल तो पागल है' मध्ये बँकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं होतं.
advertisement
7/8
आता शाहिद तब्बल 300 कोटींचा मालक आहे. शाहिदकडे केवळ आलिशान घरेच नाहीत तर महागडं कार कलेक्शन आहे. 2022 मध्ये शाहिद आणि त्याची पत्नी मीरा राजपूत वरळीच्या पॉश भागात असलेल्या थ्री सिक्स्टी वेस्टमधील त्यांच्या डुप्लेक्स घरात राहायला गेले. या घराची किंमत साधारण 59 कोटी इतकी आहे.
advertisement
8/8
शाहिदला केवळ घरांचीच नव्हे तर आलिशान गाड्यांची आवड आहे. त्याच्या गॅरेजमध्ये  1.28  कोटी किमतीची मर्सिडीज-एएमजी एस 400 आणि 1.5 दशलक्ष किमतीची हार्ले-डेव्हिडसन फॅट बॉय आहे. शाहिद अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवर त्याची हार्ले चालवताना दिसत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
वडिल सुपरस्टार, तरी मुलगा 200 फिल्म्समधून रिजेक्ट, 'विवाह' करताच लागली लॉटरी; आज 300 कोटींचा मालक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल