प्रेमासाठी कायपण, मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात बॉलिवूडचा हँडसम हंक! छातीवरच काढला टॅटू
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
खरंतर व्यक्ती आपल्या खास माणसासाठी प्रेमा खातर काहीही करू शकतो. कारण तो व्यक्ती समोरच्याच्या प्रेमामध्ये आकंठ बुडालेला असतो. सामान्य व्यक्तींप्रमाणे आता सेलिब्रिटीही आपल्या विशेष प्रेमासाठी खास टॅटू गोंदलाय. हे कपल गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमामध्ये आकंठ बुडाले आहेत. नेमकं हे सध्याचं चर्चेतलं कपल कोणतं, कोणत्या अभिनेत्याने आपल्या गर्लफ्रेंडचा टॅटू गोंदून घेतलाय, जाणून घेऊया...
advertisement
1/6

व्यक्ती त्याच्या जवळच्या व्यक्तीसाठी काहीही करू शकतो. मग तो कोणीही असो... सामान्य व्यक्तींप्रमाणे सेलिब्रिटीही आपल्या विशेष प्रेमासाठी थेट टॅटूने गोंदवलंय. सध्या इंडस्ट्रीमध्ये या बॉलिवूड कपलची जोरदार चर्चा सुरू आहे. कायमच त्यांच्या वेगवेगळ्या व्हिडिओंची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते.
advertisement
2/6
हे बॉलिवूड कपल दुसरं तिसरं कोणीही नसून बिग बॉस 15 फेम तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे कपल एकमेकांना डेट करत आहेत. बिग बॉस 15 मध्ये एकत्र स्पर्धक म्हणून गेलेलं हे कपल बिग बॉसच्या घरातून थेट प्रियकर आणि प्रेयसी म्हणूनच बाहेर आले. त्यांच्या लव्हस्टोरीची फॅन्समध्ये चर्चा होते.
advertisement
3/6
सध्या सोशल मीडियावर करण कुंद्राने त्याच्या छातीवर तेजस्वीचा टॅटू काढल्याचा फोटो जोरदार व्हायरल होत आहे. तेव्हापासून त्यांच्या लव्हस्टोरीची फॅन्समध्ये जोरदार चर्चा होताना दिसत आहे. सध्या इन्स्टाग्रामवर करणने टॅटू काढलेला फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे.
advertisement
4/6
मुंबईत झालेल्या एका रमजान पार्टीमध्ये करण कुंद्रा सहभागी झाला होता. यावेळी त्याने तेजस्वीच्या चेहऱ्याचा छातीवर काढलेला टॅटू पापाराझींसमोर फ्लॉन्ट केला होता. त्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
advertisement
5/6
करण आणि तेजस्वी गेल्या अनेक वर्षांपासून हे कपल एकमेकांना डेट करत आहेत. ते लिव्ह इनमध्येही राहतात. करण- तेजस्वी इंडस्ट्रीतील लाडके कपल असून त्यांच्या लग्नाच्या चर्चा अनेकदा चाहत्यांमध्ये रंगत असतात. चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
advertisement
6/6
अलीकडेच करण- तेजस्वीच्या लग्नाची चाहत्यांमध्ये चर्चा सुद्धा रंगली होती. पण त्यांनी त्या सर्व चर्चा धुडकावून लावल्या. दरम्यान, बिग बॉस 15 नंतर प्रत्येक रिॲलिटी शोमध्ये करण- तेजस्वी एकत्रच येत असतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्रेमासाठी कायपण, मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात बॉलिवूडचा हँडसम हंक! छातीवरच काढला टॅटू