13 वर्षे एकही हिट फिल्म नाही, तरी भारतातील सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री; 4600 कोटींची संपत्ती, कशी काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
India Rich Actress : बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानची ही हिरोईन, एकेकाळी खूप प्रसिद्ध होती. आता तिने काही फिल्ममध्ये छोट्या भूमिका केल्या, त्यामुळे तिला त्यातून मिळणारं वेतन तुटपुंजं असल्याचं सांगितलं जातं. तरी ती भारतातील श्रीमंत अभिनेत्री आहे.
advertisement
1/5

एकेकाळी आघाडीच्या अभिनेत्रीने 13 वर्षांपासून एकही हिट चित्रपट दिलेला नाही. याचं कारण म्हणजे तिने बहुतेक वेळा छोट्या भूमिका केल्या. पण तरी ती भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. 2024-35 च्या 'हुरुन रिच लिस्ट' रिपोर्टनुसार तिची एकूण संपत्ती 4600 कोटी रुपये आहे. ही अभिनेत्री कोण, फिल्ममध्ये काम करत नसतानाही तिने आपली संपत्ती कशी जमवली? असा प्रश्न पडतो.
advertisement
2/5
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नाही तर जुही चावला आहे. तिने 1986 मध्ये 'सुलतान' फिल्ममधून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. धर्मेंद्रसारख्या बॉलिवूडच्या सुपरस्टारसोबत अभिनय करून लक्ष वेधलं. यानंतर 1988 मध्ये आमिर खानसोबत 'कयामत से कयामत तक' या फिल्ममने जुही चावलाला ओळख मिळवून दिली. तिने 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या रजनीकांतच्या 'नाट्टुक्कु ओरू नल्लावन' या फिल्ममध्येही काम केलं होत.
advertisement
3/5
जुही चावलाकडे मुंबईत दोन रेस्टॉरंट्स आहेत. मुंबई आणि गुजरात अशा दोन ठिकाणी तिचे दोन मोठे बंदले आहेत. तिच्याकडे वेगवेगळ्या लक्झरी गाड्यादेखील आहेत. यात अ‍ॅस्टन मार्टिन रॅपिड (3.3 कोटी रुपये), बीएमडब्ल्यू 7 (1.8 कोटी रुपये), मर्सिडीज-बेंझ एस-क्लास (1.7 कोटी रुपये), जॅग्वार एक्सजे (1.2 कोटी रुपये) आणि पोर्शे केयेन (1.36-2 कोटी रुपये) सारख्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे.
advertisement
4/5
जुही चावलाने बहुतेक हिंदी, पंजाबी आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण चित्रपट उद्योगातून तुटपुंजं वेतन मिळतं असं म्हटलं जातं. म्हणून बिझनेस तिच्यासाठी सर्वकाही आहे. तिने रिअल इस्टेट आणि क्रिकेट टिममध्ये गुंतवणूक केली आहे.
advertisement
5/5
जुही चावला आणि शाहरुख खान हे बॉलिवूडमध्ये जवळचे मित्र आहेत. दोघांनीही कोलकाता नाईट रायडर्स संघात गुंतवणूक केली आहे. फोर्ब्स मॅगझीनच्या रिपोर्टनुसार, कोलकाता नाईट रायडर्स टीमची एकूण व्हॅल्यू 9129 कोटी रुपये आहे. जुही चावलाने 623 कोटी रुपये गुंतवल्याचं सांगितलं जातं. जुही चावला शाहरुख खानच्या रेड चिलीज प्रॉडक्शन कंपनीतही सह-भागीदार देखील आहे. सौराष्ट्र सिमेंटमध्ये तिचे 0.07 टक्के शेअर्स देखील आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
13 वर्षे एकही हिट फिल्म नाही, तरी भारतातील सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री; 4600 कोटींची संपत्ती, कशी काय?