TRENDING:

कोणाचा संसार मोडला तर कोणाचं लग्नाआधीच बिनसलं; या मराठी कलाकारांच्या ब्रेकअपने चाहत्यांना बसला होता मोठा धक्का

Last Updated:
नुकतंच अभिनेता पियुष रानडेने सुरुची आडारकर सोबत तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. आता पीयूषच्या पहिल्या दोन लग्नांविषयी चर्चा सुरु झाली आहे. पण फक्त पियुषच नाही तर मराठीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आधी सरेआर प्रेमाची कबुली दिली होती, काहींनी तर लग्न केलं पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही आणि त्यांचं ब्रेकअप झालं. कोण आहेत ते कलाकार ज्यांच्या घटस्फोट आणि ब्रेकअपच्या चर्चा गाजल्या होत्या जाणून घ्या.
advertisement
1/8
कोणाचा संसार मोडला तर कोणाचं लग्नाआधीच बिनसलं; या मराठी कलाकारांचं झालं ब्रेकअप
प्रेम, लग्न, ब्रेकअप आणि <a href="https://news18marathi.com/web-stories/viral/divorce-law-in-india-after-how-many-days-of-marriage-can-get-a-divorce-mhpp-1437755/">घटस्फोट</a> या गोष्टी सगळ्या कलाकारांच्या आयुष्यात पाहायला मिळतात. एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात वेडे झालेले कलाकार काही काळातच वेगळे होतात.
advertisement
2/8
नुकतंच अभिनेता पियुष रानडेने सुरुची आडारकर सोबत तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. त्यापूर्वी त्याने अभिनेत्री शाल्मली टोळ्ये आणि मयुरी वाघासोबत लग्न केलं होतं. पण हे दोन्ही लग्न फार काळ टिकले नाहीत आणि पियुषचा दोनदा घटस्फोट झाला.
advertisement
3/8
सध्या आई कुठे काय करते या मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी रुपाली भोसलेने तिचा मित्र आणि इव्हेंट मॅनेजर अंकित मगरे यांच्यावर खूप प्रेम करत होती. रुपालीने 2020 मध्ये अंकित सोबतच्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. मात्र 3 वर्षांनंतर दोघांनी वैयक्तिक कारणांमुळे एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
advertisement
4/8
अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांचं प्रेम एकेकाळी सर्वाधिक चर्चेचा विषय होता. पण या दोघांचं नातं आता तुटलं आहे. सुयशने आयुषी भावेसोबत लग्न केलय तर अक्षयाने हार्दिक सोबत लग्नगाठ बांधली आहे.
advertisement
5/8
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने 2013 मध्ये अमेय गोसावी सोबत लग्नगाठ बांधली होती. पण काही वर्षातच दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
advertisement
6/8
अभिनेत्री रेशम टिपणीस 20 वर्षांची असताना संजीव सेठशी लग्न केले होते. 11 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर 2004 मध्ये दोघे वेगळे झाले. रेशम सध्या तिचा बॉयफ्रेंड संदेश कीर्तिकरसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे.
advertisement
7/8
'होणार सून मी या घरची' मालिकेतून एकत्र आलेलं जोडपं म्हणजे तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर. दोघांनी 2014 मध्ये लग्नगाठ देखील बांधली पण हे लग्न वर्षभरही टिकले नाही. 2015 मध्ये हे जोडपे वेगळे झाले. नंतर शशांकने 2017 मध्ये प्रियंका ढवळेशी लग्न केले, तर तेजश्री अद्याप अविवाहित आहे.
advertisement
8/8
लोकप्रिय मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा 2018 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले होते. या दोघांचा घटस्फोट सर्वाधिक चर्चेचा विषय होता. अनिकेतने शारीरिक छळ आणि हिंसाचाराचा आरोप त्याची पत्नी आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाणने केला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कोणाचा संसार मोडला तर कोणाचं लग्नाआधीच बिनसलं; या मराठी कलाकारांच्या ब्रेकअपने चाहत्यांना बसला होता मोठा धक्का
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल